Mahadev App Scam: ईडीची सर्वात मोठी कारवाई! ३९ ठिकाणी छापेमारी; १४ पेक्षा जास्त बॉलिवूड कलाकार रडारवर

Bollywood celebrities Ed Radar: ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
 ED Raid In Mahadev App Scam
ED Raid In Mahadev App ScamSaamtv

ED Raid News:

ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी केल्याची मोठी बातमी समोर आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग अँपशी सबंधित ही सर्वात मोठी कारवाई केली असून यामध्ये तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक बडे अभिनेते रडारवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 ED Raid In Mahadev App Scam
Rasta Roko Andolan : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा; युवा सेनेचा पंढरपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे

ईडीची मोठी कारवाई...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ऑनलाइन जुगार ऍप महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ऍपचे प्रमोटर असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त...

या प्रकरणी ईडीने कोलकाता, भोपाळ आणि मुंबई येथे छापे टाकले. या छापेमारीत ईडीने तब्बल तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. यामध्ये गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.

महादेव बेटींग अँपच्या माध्यमातून करोडोंची अफरातफर होत असून काही सेलिब्रेटी आणि सरकारी अधिकाऱ्यांना यातून पैसे गेल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

दिग्गज बॉलिवूड कलाकार रडारवर

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात १४ पेक्षा अधिक बडे बॉलिवूड सेलिब्रेटी (Bollywood Celibraty) ईडीच्या रडारवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, गायिका नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान,विशाल ददलानी, भारती सिंग,नुसरत भरुचा,आतिफ अस्लम यासह अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com