Accident News: भरधाव ट्रक लग्नाच्या वरातीत घुसला; ६ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू, थरारक घटनेचा VIDEO समोर

Madhya Pradesh Accident: भरधाव वेगात असलेला ट्रक लग्नाच्या वरातीत घुसल्याने ६ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर २५ हून अधिक जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यात घडली.
Madhya Pradesh Raisen Truck Accident
Madhya Pradesh Raisen Truck AccidentSaam TV
Published On

Madhya Pradesh Wedding Procession Accident

भरधाव वेगात असलेला ट्रक लग्नाच्या वरातीत घुसल्याने ६ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. तर २५ हून अधिक जण जखमी झाले. ही दुर्देवी घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातानंतर घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. संतप्त जमावाने ट्रकची तोडफोड केली. अपघाताची (Accident News) माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा झाल्याची प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) होशंगाबादहून रायसेन येथे लग्नाची मिरवणूक आली होती. सुलतानपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत खामरिया गावाजवळ सोमवारी रात्री वऱ्हाडी नाचत असताना अचानक भरधाव ट्रक आला.

काही क्षणातच या ट्रकने वऱ्हाड्यांना चिरडून टाकलं. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय मार्गावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी भोपाळ येथील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Madhya Pradesh Raisen Truck Accident
Nashik Breaking News: गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं; अनैतिक संबंधातून माजी सैनिकाची हत्या, परिसरात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com