Donkey Fair: अरेच्चा! सोन्याच्या दरात गाढवांची विक्री; अनोख्या जत्रेची सर्वत्र चर्चा

Madhya Pradesh Tourist Places News: या जत्रेमधील खास गोष्ट म्हणजे येथे चक्क गाढव लाखोंच्या भावात विकले जातात. त्यामुळे या गाढवांना पाहण्यासाठी जत्रेमध्ये लंबूनलंबून लोक येत असतात.
Donkey Fair
Donkey FairSaam TV
Published On

Travel News:

जत्रेत फिरायला सर्वांनाच आवडतं. जत्रेत असलेली झगमग, आकाशपाळणे, खाण्याचे चमचमीत पदार्थ, शोभेच्या वस्तू अशा अनेक आकर्षक गोष्टी असतात. अशात आज मध्यप्रदेशमधील एका अनोख्या जत्रेची माहिती जाणून घेणार आहोत. या जत्रेमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्ट घडतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Donkey Fair
New Year Special Local Trains: मध्य रेल्वेकडून प्रवाशांना नववर्षाची भेट; ३१ डिसेंबरला मध्यरात्री चालवणार विशेष लोकल ट्रेन,पाहा वेळापत्रक

प्रत्येक जत्रा एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध असते. मध्यप्रदेशमधील सतनाच्या चित्रकूटमध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी एक अनोखी जत्रा भरते. या जत्रेमधील खास गोष्ट म्हणजे येथे चक्क गाढव लाखोंच्या भावात विकले जातात. त्यामुळे या गाढवांना पाहण्यासाठी जत्रेमध्ये लंबूनलंबून लोक येत असतात. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच या जत्रेचा आनंद घेतात.

गाढवांचा लिलाव

गाढवांच्या या जत्रेत आणखी एक चकित करणारी गोष्ट आहे. ती म्हणजे येथे आलेल्या सर्व गाढवांना बॉलिवूडमधील कलाकारांची नावे देण्यात आलीत. सलमान, शाहरुख, अजय, आलिया, करीना, कॅटरीना अशी नावे येथील गाढवांना देण्यात आली आहेत. येथे आलेल्या प्रत्येक गाढवाचा लिलाव केला जातो. सलमान नाव असलेल्या गढवांची किंमत लाखोंच्या घरात आहे.

गेल्या वर्षी सलमान नावाचे गाढव 1 लाख तर शाहरुख नावाचे गाढव 90 हजार रुपयांना लिलावात विकले गेले. यासह इतर कलाकारांचे नाव असलेले गाढव 70 ते 60 हजार रुपयांना विकले गेले. असं म्हटलं जातं की या जत्रेची सुरुवात औरंगजेबाने केली होती. या जत्रेत गाढव विकण्यासाठी एन्ट्री फी देखील भरावी लागते. एका व्यक्ती करून 300 रुपये एन्ट्री फी घेतली जाते.

Donkey Fair
Grapes Farming: द्राक्ष बागेची संरक्षण शेती; शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानपासून शेतकरी मात्र वंचित

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com