गावखेड्यात शेतातल्या प्राण्यांना पळवून लावण्यासाठी तयार करण्यात आलेली ही जुगाडू देशी कार्बाइड गन....या दिवाळीत लहान मुलांपासून मोठ्यांनीही ही गन विकत घेतली आणि फटाक्यांसाठी नवा पर्याय शोधला. मात्र शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारी ही कार्बाइड गन आता नागरिकाच्या जीवावर उठलीय...या गन फटाक्यामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाली असून काही जण कायमचे दृष्टीहीन झालेत...
कार्बाडइ गन फटाक्याच्या च्या स्फोटानंतर प्लॅस्टिकचे छोटे तुकडे शरीराला इजा पोहचवतात...विशेषत: डोळे, चेहरा आणि त्वचेसाठी हे धोकादायक ठरू शकते... आत्तापर्यंत तब्बल 200 हून अधिक लहान मुलं या कार्बाइड गन फटाक्यामुळे गंभीर जखमी झाली असून एकाला कायमची दृष्टी गमवावी लागली आहे.
मध्यप्रदेशमध्ये या कार्बाइड गनमुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं सरकारनंही या गनवर बंदी घालण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु केलेत...तर विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे...
दरम्यान पोलिसांनी कार्बाइड गन फटाक्याची विक्री करणाऱ्या 7 विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून 228 प्लास्टिक गन आणि चार किलो कॅल्शियम कार्बाइड जप्त केलयं...तसचं पोलिस प्रशासनही कार्बाइड गन विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहे..... त्यामुळे मध्यप्रदेश सारखं इतर ठिकाणीही कार्बाइड गनवर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरु करायला हवेत... मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊन दृष्टी गमावण्याची वेळ येण्याआधीच यावर कारवाई होणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.