Madhya Pradesh: अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बस चालकाला 190 वर्षांची शिक्षा
Madhya Pradesh: अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बस चालकाला 190 वर्षांची शिक्षा

Madhya Pradesh: अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बस चालकाला 190 वर्षांची शिक्षा

जीवघेण्या अपघातात चालकाला एवढी तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
Published on

भोपाळ: मध्यप्रदेशच्या पन्ना येथे बस अपघातात 22 लोकांचा मृत्यू झाल्याच्या (Bus Accident MP) सहा वर्षांनंतर, स्थानिक न्यायालयाने ड्रायव्हरला 190 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे (190 Years Of Imprisonment) . 19 गुन्ह्यात प्रत्येकी 10 वर्षे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सर्व शिक्षा स्वतंत्रपणे चालतील, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. जीवघेण्या अपघातात चालकाला एवढी तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

Madhya Pradesh: अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बस चालकाला 190 वर्षांची शिक्षा
Noida: कर्फ्यूच्या वेळी जेवण देण्यास नकार; गोळ्या घालून मालकाची हत्या

ड्रायव्हर शमशुद्दीन (47), याला हत्या आणि रॅश ड्रायव्हिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे तसेच बस मालकाला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे, असे सहायक सरकारी वकील कपिल व्यास यांनी सांगितले. 4 मे 2015 रोजी, 65 प्रवासी घेऊन प्रवासी बस (M P0533) मडला टेकडीजवळ कोरड्या कालव्यात पडली आणि तिला आग लागली त्यात 22 लोक ठार झाले होते तर डझनभर लोक जखमी झाले होते.

तपासादरम्यान असे आढळून आले की गाडीतील इमर्जन्सी एक्झिट लोखंडी रॉडने बंद केली होती तर त्या जागी अतिरिक्त सीट बसवण्यात आले होते. या आगीत प्रवासी अडकले होते आणि ज्यांचा मृत्यू झाला होता ते ओळखण्यापलीकडे जळाले होते. प्रवाशांनी गाडी कमी वेगात चालवण्याची विनंती करूनही शमशुद्दीने बेकायदेशीर जोरात गाडी चालवल्याचा आरोप होता.

चालक आणि बस मालक ज्ञानेंद्र पांडे हे सतना येथील रहिवासी आहेत, जिथून बस निघाली होती. आरोपींवर आयपीसी कलम 304 (अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 304 (हत्या), 279 आणि 337 (दोन्ही रॅश ड्रायव्हिंग) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायाधीश आर पी सोनकर यांच्या न्यायालयात खटला सुरू झाला होता. शुक्रवारी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की 19 10 वर्षांची शिक्षा स्वतंत्रपणे चालवली जाईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com