Gyanvapi Masjid Case: ज्ञानव्यापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी कोर्टानं फेटाळली

Gyanvapi Masjid Case News: चार महिलांनी या संदर्भात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Gyanvapi Masjid Case
Gyanvapi Masjid Case Saam Tv
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Gyanvapi Masjid Case News: ज्ञानवापी सर्वेक्षणात सापडलेल्या 'शिवलिंगा'चं कार्बन डेटींग होणार नाही असा निर्णय वाराणसी न्यायालायने दिला आहे. ज्ञानवापी सर्वेक्षणात सापडलेल्या 'शिवलिंगा'ची कार्बन डेटींग करायची की नाही या संदर्भात आज वाराणसी न्यायालयाने दिला आहे. चार महिलांनी या संदर्भात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या संदर्भात 11 ऑक्टोबरला न्यायालय निर्णय देणार होते. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.

Gyanvapi Masjid Case
BJP Diwali 2022: भाजपकडून मराठमोळा दिपोत्सव साजरा होणार; BMC निवडणुकीसाठी भाजपचं मराठी कार्ड...

कार्बन डेटींग म्हणजे काय?

कार्बन डेटींग म्हणजे वय शोधणं होय. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C-14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचं अणू वस्तुमान 14 इतकं असतं. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो. आणि जशी जशी सदर वस्तू नष्ट होते. त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरुन एखाद्या धातू आणि सजीव प्राण्याचं वय ठरवलं जातं.

मात्र, शिवलिंग हा दगड आहे. धातूमध्ये कार्बनचं प्रमाण असते. दगडामध्ये कार्बन नसतो. त्यामुळे दगडाचं कार्बन डेटिंग करणं शक्य नाही. मात्र, शिवलिंगाची स्थापना करताना धातूचा वापर केला जातो. यावरून वय ठरवणे शक्य होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.

Gyanvapi Masjid Case
Bombay High Court: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले प्राध्यापक साईबाबा यांची निर्दोष मुक्तता; माओवाद्यांशी संबंध असल्याचा होता आरोप

काय आहे ज्ञानवापी प्रकरण?

उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील शंकराच्या मंदीराशेजारी एक ज्ञानव्यापी मशीद आहे. या मशिदीच्या आत श्रृंगार गौरीची पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी 5 हिंदू महिलांनी एक याचिका दाखल केली आहे. या मशिदीच्या अंजुमन इंतजामिया कमेटीने या महिलेच्या याचिकेला आव्हान दिले होते. मात्र, समितीने न्यायालयात प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चा संदर्भ देत यावर सुनावणी घेण्यास विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास परवानगी दिल्याने सध्या यावर सुनावणी झाली. यात वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी येथील शिवलिंगाचे कार्बन डेटींग करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com