अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच खळबळजनक वृत्त हाती आलं आहे. दहशतवादी संघटना ISIS च्या एका दहशतवाद्याला एटीएसने अलिगडमधून अटक केली आहे. ISIS च्या अलिगड मॉड्यूलच्या आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाआधीच दहशतवादी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. (Latest Marathi News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने दहशतवादी फैजान बख्तियार अटक केली. फैजानने प्रयागराजच्या रिजवान अशरफच्या माध्यमातून ISIS मध्ये प्रवेश केला होता. फैजानच्या काही साथीदारांनी अलीगडसाठी ISIS मॉड्यूल तयार केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या मॉड्यूलच्या माध्यमातून त्यांची मोठ्या घातपाताची तयारी सुरु होती. तर दहशतवादी फैजान बख्तियार अलीगड मुस्लिम विद्यापीठातून 'मास्टर इन सोशल वर्क'च्या पदवीचं शिक्षण घेत होता.
नोव्हेंबरमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठात पेट्रोकैमिकलमध्ये बीटेक करणाऱ्या अब्दुल्ला अर्सलानला यूपी एटीएसने अटक केली होती. एटीएसचा दावा आहे की, अर्सलान हा ISIS संघटनेशी संबंधित आहे.
तो जिहादसाठी फौज तयार करत होता. एटीएसचा असाही दावा आहे की, त्याच्या खोलीतून अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. एटीएसने त्याच्या जवळून पेन ड्राइव्ह, मोबाइलसहित अनेक संशयित वस्तू त्याच्याजवळून हस्तगत केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.