LPG Cylinder Price : डिसेंबरच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

इंधन दरवाढीची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीतबाबत मोठा दिलासा दिला आहे.
LPG Cylinder Price Today
LPG Cylinder Price Today Saam TV

LPG Cylinder Price Today : इंधन दरवाढीची झळ सहन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीतबाबत मोठा दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. अर्थात सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून काही काळ दिलासा मिळाला आहे.  (Latest Marathi News)

LPG Cylinder Price Today
Uniform Civil Code : राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले..,

IOCL म्हणजेच इंडियन ऑईलने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज घरगुती गॅस सिलेंडर (LPG Cylinder) आणि कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. सिलेंडरचे दर स्थिर आहे. ऑक्टोबर महिन्यात तेल कंपन्यांकडून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत ११५ रुपयांची कपात करण्यात आली होती.

घरगुती गॅस सिलेंडरचा दर काय?

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, आज म्हणजेच १ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली आणि कोलकत्त्यात घरगुती LPG सिलेंडरचा (LPG Gas) दर प्रत्येकी १ हजार ५३ रुपये इतका आहे. दुसरीकडे मुंबईत घरगुती गॅस सिलेंडर १ हजार ५२ रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरचे दर १ हजार ६८ रुपयांवर स्थिर आहे.

LPG Cylinder Price Today
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होणार? आजचे नवीनतम दर तपासा

व्यावसायिक सिलेंडरचा भाव काय?

आज दिल्लीत व्यावसायिक १ हजार ७४४ रुपये इतका आहे. कोलकत्यात व्यावसायिक सिलेंडर १ हजार ८४५ रुपयांना मिळत आहे. दुसरीकडे मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर १ हजार ६९६ रुपये इतके आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा भाव १ हजार ८९१ रुपये इतका आहे.

गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त झाले होते. सलग सहा वेळा व्यावसायिक सिलिंडर स्वस्त मिळत होते. मात्र आज व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महागाईची झळ सहन करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com