Mahila Aarakshan Bill: मोठी बातमी! ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर

Lok Sabha Passes Women's Reservation Bill: मोठी बातमी! नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर
Women's Reservation Bill
Women's Reservation BillSaam Tv
Published On

Women's Reservation Bill 2023:

महिला आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मांडलेलं 'नारी शक्ती वंदन विधेयक' लोकसभेत मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. सभागृहात मतदान स्लिपद्वारे झाले, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला.

मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सभागृहात हे सादर केले. या विधेयकात विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मोदी मंत्रिमंडळाने सोमवारी या विधेयकाला मंजुरी दिली, त्यानंतर विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे विधेयक मांडण्यात आले.

Women's Reservation Bill
Rahul Gandhi : डरो मत... महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेवेळी राहुल गांधी ओबीसी मुद्द्यावर बोलले

आता राज्यसभेत मांडले जाणार हे विधेयक

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता या विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहात याची घोषणा केली. ते म्हणाले की, सभागृहातील विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी येथे संविधान (एकशे अठ्ठावीसवी दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चा करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते वरच्या सभागृहात चर्चेसाठी आणि पास करण्यासाठी मांडले जाईल. या विधेयकावर चर्चेसाठी साडे सात तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

Women's Reservation Bill
Prithviraj Chavan News: 'मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील', पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा

याआधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या विधेयकाचे समर्थन केले होते. परंतु इतर मागासवर्गीय (OBC) महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद असावी, कारण त्याशिवाय हे विधेयक अपूर्ण आहे. या विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेत भाग घेताना त्यांनी सरकारला हा आग्रह केला.

जातनिहाय जनगणना तात्काळ करा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात झालेल्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी. सत्ताधारी पक्ष जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com