Lok Sabha Elections 2024 : काँग्रेसकडून आणखी ६ उमेदवारांच्या नावांची घोषणा; दक्षिण गोव्यातील खासदाराचं तिकीट कापलं

Congress goa and madhya pradesh candidate : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी आणखी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या उमेदवारांमध्ये विरियाटो फर्नांडिस यांच्या नावाचा समावेश आहे.
Congress Candidates List
Congress Candidates ListSaam tv

Lok Sabha Elections 2024 :

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी आणखी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या उमेदवारांमध्ये विरियाटो फर्नांडिस यांच्या नावाचा समावेश आहे. तर दक्षिण गोवा मतदारसंघातील विद्यमान खासदार फ्रान्सिको सारदिन्हा यांचं तिकीट कापल्याची माहिती हाती आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सारदिन्हा हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचीही भूमिका निभावली होती. तर काँग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली आहे.

मध्य प्रदेशच्या मुरैनामधून सत्यपाल सिंह सीकरवार, ग्वालियरमधून प्रवीण पाठक, खंडवातून नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. तर दादरा एवं नगर हवेलीतून अजीत रामजी भाई महला यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसने आतापर्यंत २४१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रसने आतापर्यंत उमेदवारांच्या १२ याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातून २३५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

देशात १८ व्या लोकसभेची निवडणूक १९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या निवडणुकीत २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून असे अनुक्रमे मतदान असणार आहे. तर मतमोजणी चार जूनला होणार आहे.

Congress Candidates List
Lalu Prasad Yadav: ऐन लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, न्यायालयाने जारी केलं अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

महायुतीकडून कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी- फडणवीस

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याणच्या लोकसभा मतदारसंघावरून महायुती तिढा सुरु आहे. ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा शिंदे गटाचा निश्चय आहे. तर भाजप ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार, असं मोठं वक्तव्य फडणवीसांनी केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com