चीन 'झिरो कोविड पॉलिसी'चे पालन करत आहे. चीनमधील सर्वात मोठे शहर शांघायमध्ये कोविडचा फैलाव लक्षात घेत चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन (Strict Lockdown) लागू केले आहे. यादरम्यान, कडक कोविड लॉकडाऊनमुळे तेथील संतप्त लोकांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात लोक त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ओरडताना ऐकू येत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये लोक स्थानिक अधिकाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. या अशा कडक लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा लोक देत आहेत.
चीनने आपल्या कठोर कोविड धोरणानुसार, चीनने संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 5 एप्रिलपासून शांघाय पूर्णपणे बंद केले आहे.त्यामुळे शहरातील 26 कोटी जनता त्यांच्या घरात अक्षरशः कैद झाली आहे.
अमेरिकेत राहणारे प्रसिद्ध आरोग्य शास्त्रज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी शांघायचे काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिले की, चीनचे लोक अपार्टमेंटमधून स्थानिक बोली भाषा शांघायमध्ये ओरडत आहेत.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ' लॉकडाऊनच्या सातव्या दिवशी शांघाईचे निवासी लोक आपल्या उंच अपार्टमेंट्समधून ओरडत आहेत. जो व्यक्ती ओरडत आहे तो म्हणत आहे की, पुढे खूप अडचणी येणार आहेत. तो म्हणतो की तुम्ही लोकांना जास्त दिवस थांबू शकत नाही.
डॉ एरिक यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, लोकांचा राग लवकरच बाहेर येणार आहे.
व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत त्यांनी लिहिले, 'व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे. माझ्या सूत्रांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. शांघायनी ही स्थानिक बोली आहे. चीनच्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी केवळ 140 दशलक्ष लोक चिनी ते बोलतात. ते म्हणतात मला ही भाषा अवगत आहे कारण माझा जन्म तिथे झाला आहे.
आरोग्य तज्ञांनी सांगितले की शांघायमध्ये कोविड प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि चीनमध्ये ओमिक्रॉनच्या BA.2 व्हेरियंट आणखी फैलणार आहे.
अन्नपदार्थांच्या कमतरतेमुळे लोक त्रस्त;
शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे घरात कैद असलेल्या लोकांसाठी अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात लोक कमी खर्चात जास्त दिवस भाजी साठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
रविवारी शांघायमध्ये 25 हजार कोविडची प्रकरणे समोर आली आहेत. जगातील इतर शहरांच्या तुलनेत ही प्रकरणे खूपच कमी आहेत, परंतु चीनच्या मते, 2019 मध्ये वुहानमधून कोविडचा उद्रेक झाल्यानंतर, चीन आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक कोविड संसर्गाचा सामना करत आहे.
शांघायच्या रस्त्यावर सामान्य नागरिकांच्या बाहेर पडण्यास पूर्ण बंदी आहे. केवळ आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, वस्तू वितरीत करणारे लोक आणि विशेष परवानगी असलेल्यांना शांघायच्या रस्त्यावर येण्याची परवानगी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.