सतत मोबाईल होतोय हॅंग!; 'या' ट्रिकमुळं स्मार्टफोन होईल सुपरफास्ट

जेव्हा मोबाईलमधील रॅम पूर्णपणे भरलेलं असतं, तेव्हा मोबईल हॅंग होण्याची शक्यता जास्त असते.
Mobile Hang
Mobile HangSaam Tv

मोबाईल हा आपल्या जीवनातील जणू अविभाज्य घटक बनला आहे. महत्वाची सर्वच कामं मोबाईल फोनच्या माध्यमातून होत असतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, अनेकदा मोबाईल हॅंग होण्याची समस्या उद्भवते आणि आपण हाती घेतलेलं महत्वाचं काम मार्गी लावण्यात अडथळा निर्माण होतो. तसंच अनेकदा आपण महत्वाचं काम करत असताना आपला मोबाईल अचानक हॅंग झाल्यावर मोठं नुकसानही होतं. मात्र तुम्ही आता जराही टेंशन घेऊ नका. काही टिप्स जाणून घेऊयात, ज्यामुळे फोन हॅंग होण्याची समस्या सुटून फोनचे प्रोसेसिंग स्पीडही वाढेल. (How To Make Mobile Superfast)

जेव्हा मोबाईलमधील रॅम पूर्णपणे भरलेलं असतं, तेव्हा मोबईल हॅंग होण्याची शक्यता जास्त असते. मोबाईल हॅंग होऊ नये यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये महत्वाच्या नसणाऱ्या अॅप्लिकेशन्स डीलीट करू शकता. ज्यामुळे फोनचा प्रोसेसिंग स्पीडही वाढतो. कमी किमतीचे साधे मोबाईल फोनमध्ये रॅम वाढवणं शक्य नसतं तसंच अशा स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंग स्पीडही कमी असतो. त्यामुळे फोनमध्ये रॅमची कॅपेसिटीही महत्वाची असते.

तसंच अतंत्य महत्वाचं म्हणजे मोबाईल फोनमधील कॅचे फाईल्स क्लीयर केल्यावर फोन हॅंग होण्याच्या समस्येपासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तसंच जेव्हा फोनमध्ये खूप साऱ्या अॅप्लिकेशन्स अॅक्टिव्ह असतात आणि रॅम कमी असतो तेव्हा फोन हॅंग होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी मोबाईल फोनमध्ये ज्या अॅप्लिकेशन्स अॅक्टिव्ह असतात ज्यांचा आपण वापर करत नाही अशा अॅप्सला रॅममधून काढून टाकणे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com