Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Stray DogsSaam Tv News

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Uttar Pradesh Government: उत्तर प्रदेश सरकारने भटक्या कुत्र्यांसंदर्भात गाइडलाइन्स जारी केली आहे. कुत्र्यांनी एखाद्या व्यक्तीला चावा घेतल्यास त्या कुत्र्याला शिक्षा होणार आहे. या कुत्र्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.
Published on

Summary -

  • उत्तर प्रदेश सरकार भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाई करणार आहे.

  • एखाद्या व्यक्तीला दोन वेळा चावा घेतल्यास कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.

  • कुत्र्यांना एबीसी सेंटरमध्ये ठेवून मायक्रोचिपद्वारे त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवले जाईल.

उत्तर प्रदेशमध्ये भटक्या कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या घटनांना आता सरकारने गांभीर्याने घेतलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची आता खैर नाही. भटक्या कुत्र्यांनी जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला आणि दोन वेळा चावा घेतला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. एखाद्या गुन्ह्यासाठी माणासाला दिली जाते तशी शिक्षा आता कुत्र्यांना होणार आहे. हा आदेश उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने जारी केला आहे. सरकारच्या आदेशानंतर आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या समस्या लक्षात घेता नगरविकास खात्याचे प्रधान सचिव अमृत अभिजात यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यातील सर्व नगरपालिका संस्थांना एक नवीन आदेश जारी केला आहे. यामध्ये हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जर कुत्रा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला चावला तर त्याला १० दिवसांची शिक्षा होईल आणि जर तो दुसऱ्यांदा चावला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होईल. म्हणजे त्या कुत्र्याला आयुष्यभर अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये ठेवले जाईल.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Shocking News: नशीब म्हणावं ते हेच! महिला रस्त्यावरून जात होती, अचानक भींत कोसळली, अंगावर काटा आणणारा VIDEO

प्रयागराज महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आणि कल्याण अधिकारी डॉ. विजय अमृतराज यांनी सांगितले की, नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार जर कुत्रा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला चावला तर त्या कुत्र्याला १० दिवसांची शिक्षा होईल. या काळात कुत्र्याला अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल म्हणजेच एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाईल. पण जर तोच कुत्रा दुसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीला चावला तर ३ सदस्यांची टीम या प्रकरणाची चौकशी करेल. त्यानंतर त्या कुत्र्याला पुन्हा आयुष्यभर एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाईल.

Stray Dogs: आता कुत्र्यालाही जन्मठेपेची शिक्षा होणार, या राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Shocking : पोलिसांची नजर चुकवली, गळ्याला वायर लावली, पोलीस ठाण्यात आरोपीचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कुत्र्याला जेव्हा एखादी व्यक्ती अधिकृतपणे दत्तक घेईल तेव्हाच त्याला सोडले जाईल. हल्ला करणाऱ्या आणि हिंसक कुत्र्यांना शिक्षा करण्यासाठी जारी केलेल्या आदेशात काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. यासाठी पीडित व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारांचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. उपचारांसोबतच कुत्र्याला एबीसी सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवले जाईल. १० दिवसांनी एबीसी सेंटरमधून सोडण्यापूर्वी कुत्र्याच्या शरीरावर मायक्रोचिप बसवली जाईल. या मायक्रोचिपद्वारे कुत्र्याच्या वर्तनाचे निरीक्षण करण्यात येईल.

Shocking : अजब लव्ह स्टोरी! नवरा मेहुणीच्या प्रेमात पडला, मेहुणा भावजीच्या बहिणीसोबत गेला पळून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com