Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांनी 21व्या दिवशी सोडलं उपोषण, काय आहेत त्यांच्या मागण्या?

Sonam Wangchuk Hunger Strike: लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी 21 दिवसानंतर त्यांचं उपोषण सोडलं आहे.
Sonam Wangchuk Hunger Strike
Sonam Wangchuk Hunger StrikeSaam Tv

Sonam Wangchuk Hunger Strike:

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी 21 दिवसानंतर त्यांचं उपोषण सोडलं आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. 21 दिवस मीठ आणि पाण्यावर उपोषण केल्यानंतर आज वांगचुक यांनी उपोषण सोडताना आपला लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, 'मी लडाखच्या घटनात्मक रक्षणासाठी आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढत राहीन.' यावेळी केंद्रशासित प्रदेशातील विविध भागांतून आज हजारो लोक एकत्र आले होते. यातच महिलांच्या एका गटाने सांगितले की, ते या मागण्यांसाठी आता उपोषण करणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sonam Wangchuk Hunger Strike
Lok Sabha Election 2024: भाजपच्या उमेदवारांची सहावी यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी? जाणून घ्या

सोनम वांचुक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहनही केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांची तब्येत खूपच खालावली दिसत आहे. त्यांनी लडाखच्या लोकांना राष्ट्रहितासाठी यावेळी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.  (Latest Marathi News)

लडाखबाबत सोनम वांगचुक यांच्या या आहेत मागण्या

1. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, अशी सोनम वांगचुक यांची मागणी आहे.

2. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Sonam Wangchuk Hunger Strike
Punjab Lok Sabha : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचे निकटवर्तीय रवनीत बिट्टू यांचा भाजपमध्ये प्रवेश

3. लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागांचीही मागणी आहे.

4. लडाखमध्ये स्थानिक लोकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीच्या हक्कांची मागणीही त्यांनी केली.

5. लडाखमध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणीही वांगचुक यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com