Punjab Lok Sabha : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींचे निकटवर्तीय रवनीत बिट्टू यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला पुन्हा एकदा झटका बसला आहे. पंजाबमधील लुथियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीत बिट्टू यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
Congress MP Ravneet Singh Bittu joins BJP
Congress MP Ravneet Singh Bittu joins BJPSaam Tv
Published On

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला पुन्हा एकदा झटका बसला आहे. पंजाबमधील लुथियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीत बिट्टू यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले.

रवनीत बिट्टू हे पंजाब काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. ते राहुल गांधी यांचे समर्थक आणि जवळचे मित्र असल्याचेही बोलले जाते. आज रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Congress MP Ravneet Singh Bittu joins BJP
Lok Sabha Election 2024: मविआचा वंचितला नवीन प्रस्ताव, प्रकाश आंबेडकर करणार स्वीकार?

पंजाबमध्ये इंडिया आघाडीचे आम आदमी पक्षासोबत आघाडीच्या जागांवर आधीच मतभेद आहेत. आम आदमी पक्षाने काही दिवसांपूर्वी पंजाबमधील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली होती. आता पंजाबमध्ये बिट्टू यांचा पाठिंबा गमावल्याने काँग्रेससाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.  (Latest Marathi News)

कोण आहेत रवनीत बिट्टू?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत बिट्टू हे पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांची मजबूत पकड आहे. राहुल गांधी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे हायकमांडमध्येही त्यांचा बराच दबदबा असल्याचे मानले जाते.

Congress MP Ravneet Singh Bittu joins BJP
Kalyan Crime: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला जेल की बेल? उद्या निर्णय होण्याची शक्यता

मार्च 2021 मध्ये रवनीत सिंह बिट्टू यांना काही काळासाठी लोकसभेत काँग्रेसचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी 11 मार्च 2021 ते 18 जुलै 2021 पर्यंत लोकसभेत काँग्रेसचे नेते म्हणून काम केले. या काळात काँग्रेसचे विद्यमान लोकसभा नेते अधीर रंजन चौधरी 2021 च्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com