Kalyan Crime: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला जेल की बेल? उद्या निर्णय होण्याची शक्यता

MLA Ganpat Gaikwad Firing Case: गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शहारप्रमुख महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामिनअर्जावर आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
Vaibhav Gaikwad
Vaibhav GaikwadSaam Tv
Published On

>> अभिजित देशमुख, कल्याण

MLA Ganpat Gaikwad Firing Case:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिवसेना शहारप्रमुख महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणी गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजुच्या वकिलांकडून तीन तास युक्तिवाद सुरू होता.

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने वैभव गायकवाड यांचा अटकपूर्व जामीनावर निकाल राखून ठेवला. उद्या वैभव यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावर निर्णय होन्याची शक्यता असून वैभव यांना बेल की जेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vaibhav Gaikwad
Lok Sabha Election: 'वंचित'शिवाय महाविकास आघाडीचा ‌फॉर्म्युला तयार? संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड, त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, संदीप सरवणकर, रणजित यादव, हर्षल केने, नागेश बेडेकर, विकी गणात्रा यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  (Latest Marathi News)

या प्रकरणी गणपत गायकवाड, संदीप सरवणकर, रणजित यादव ,हर्षल केने, विकी गणात्रा या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तर गायकवाड यांच्या मुलगा वैभव गायकवाड घटना घडल्यानंतर अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वैभव गायकवाड यांच्या वकिलांनी कल्यान जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. आज या अटकपूर्व जामीनावर सुनावणी घेण्यात आली.

Vaibhav Gaikwad
Jyoti Mete: ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधकपदाचा राजीनामा, बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब

मंगळवारी दुपारी वैभव गायकवाड यांच्या वतीने वकिल सुदीप पासबोला, अनिकेत निकम आणि उमर काझी यांनी युक्तावाद केला. तर सरकारी वकील राजन साळुंखे, कासम शेख ,सचीन कुलकर्णी यांनी बाजू मांडली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. इनामदार यांच्यासमोर युक्तीवाद केला गेला. दोन्ही बाजूच्या वकीलांनी आपल्या बाजूने निकाल द्यावा याकरीता उच्च न्यायालयातील यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचे दाखले दिले.अडीच तास दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून उद्या निकाल देण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com