Lata Mangeshkar: अयोध्येत 24 तास घुमतो लता दीदींचा आवाज; उत्तरप्रदेश सरकारची गानकोकिळेला अनोखी मानवंदना

अयोध्येत येणारा प्रत्येकजण फक्त लता दीदींची गाणीच ऐकत नाही तर या ठिकाणी फोटोही काढताना दिसतात.
Lata Mangeshkar Chouk UttarPradesh
Lata Mangeshkar Chouk UttarPradeshSaamtv
Published On

Lata Mangeshkar Death Anniversary: भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. आपल्या मधूर आवाजाने त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वामध्ये कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली.

आपल्या जादुई आवाजाने त्यांनी संगीत जगताला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले. आज त्यांच्या स्मरणार्थ देशभरामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का, उत्तरप्रदेशमध्ये आजही २४ तास त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. (Lata Mangeshkar)

Lata Mangeshkar Chouk UttarPradesh
Lata Mangeshkar Death Anniversary: लतादीदींना अनोखी आदरांजली; चाहत्याने साकारलं आकर्षक

प्रभू श्रीरामांची पवित्र भूमी असलेल्या अयोध्येत एका चौकाला उत्तर प्रदेश सरकारने लता मंगेशकर यांचे नाव दिले आहे. या ठिकाणी दिवसाचे 24 तास लता मंगेशकर यांनी गायलेले राम भजन ऐकवली जातात. इतकेच नव्हे तर लतादीदींच्या स्मरणार्थ त्या चौकात तब्बल 14 टन वजनाचा विणा बसवण्यात आला आहे. ज्यामध्ये सरस्वती मातेची चित्रे कोरलेली आहेत.

त्यामुळे अयोध्येत येणारा प्रत्येकजण फक्त लता दीदींची गाणीच ऐकत नाही तर या ठिकाणी फोटोही काढताना दिसतात.

Lata Mangeshkar Chouk UttarPradesh
Chain Snatching Video : चोरट्याने महिलेच्या गळ्यातून अशी ओढली सोनसाखळी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, आपल्या जादुई आवाजाने लता मंगेशकर यांनी दोन दशके संगीत क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यांच्या याच यशाबद्दल त्यांना भारतरत्न हा आपल्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. लता दीदींनी जवळ जवळ 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर 1000 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटात गाणी गाण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com