दिलासादायक! गेल्या २४ तासांत २५२८ नवीन कोरोनाबाधित तर १४९ जणांचा मृत्यू

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी- कमी होत आहे.
Corona Cases Today
Corona Cases TodaySaam TV
Published On

वृत्तसंस्था: देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसागणिक कमी- कमी होत आहे. देशात गेल्या २४ तासामध्ये २ हजार ५२८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १४९जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरामध्ये ३ हजार ९९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात एकुण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार १८१ वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्ण सकारात्मक दर ०.४० इतका झाला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या आकडेवारीच्या माहितीनुसार, आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ३७ हजार ७२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८० कोटींहून अधिक डोस (Dose) देण्यात आले आहेत. देशात लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८० कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरामध्ये २० लाख ३१ हजार २७५ डोस देण्यात आले आहेत.

यानंतर आतापर्यंत लसीचे १८० कोटी १३ लाख २३ हजार ५४७ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींपेक्षा जास्त कोरोना लस देण्यात आले आहेत.

Corona Cases Today
खार्किवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यामध्ये २१ ठार; न्यायालयाचा आदेश झुगारला

चीनमध्ये परत एकदा कोरोना (Corona) विषाणूने चांगलेच डोके वर काढले आहे. अनेक शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २०१९ मध्ये वुहान शहरामध्ये झालेल्या कोरोना विस्फोटाप्रमाणे परत एकदा चीनमध्ये महामारी पसरण्यास सुरुवात झाली आहे. चीनमध्ये रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्या ३ हजार ३९३ कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. साधारण २ वर्षांनंतर चीनमध्ये (China) पहिल्यांदा ३ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे चीनमधील नागरिकांची चिंता परत एकदा वाढली आहे. कोरोना (Corona) महामारीचा उद्रेक बघता चीनमधील काही शहरामध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com