खार्किवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यामध्ये २१ ठार; न्यायालयाचा आदेश झुगारला

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २३ व्या दिवशी सुरूच आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSaamTv
Published On

वृत्तसंस्था: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २३ व्या दिवशी सुरूच आहे. २ देशात युद्ध थांबवण्याच्या चर्चेला अद्याप यश आले नाही. दरम्यान, रशियाची (Russia) आक्रमक भूमिका कायम आहे. २३ तारखेला देखील रशियाने युक्रेनमधील (Ukraine) अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले आहे. रशियन सैनिकांनी खार्किवजवळ हवाई हल्ला देखील (Airstrike) करण्यात आला आहे. हवाई हल्ल्यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर रशियाने युद्ध थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय (International) न्यायालयाचा आदेश देखील फेटाळत युक्रेनवरील हल्ला सुरुच ठेवला आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या अहवालाच्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळ थिएटरवर हवाई हल्ला केला आहे. येथील एका चित्रपटगृहावर बॉम्ब हल्ला (Bomb attack) करण्यात आला. या थिएटरमध्ये सुमारे १ हजार लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यामध्ये २१ जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश देखील फेटाळला आहे. गुरुवारी रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Russia Ukraine War
Beed: जावयाच्या मिरवणुकीसाठी ग्रामस्थांनी केलं गाढवाला सज्ज...(पहा Video)

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (court) बुधवारी एक आदेश देत रशियाला युक्रेनवरील हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले होते. रशियन सैन्याने २२ व्या दिवशी देखील युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब हल्ला करण्यात आले आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमधील अनेक इमारतींवरही बॉम्बफेक करण्यात आला आहे. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com