लखनऊ: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकरी हत्याकांडाप्रकरणी उत्तर प्रदेशचे गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला एसआयटीने (SIT) मुख्य आरोपी म्हणून घोषित केलं आहे. एसआयटीने याप्रकरणी न्यायालयात पाच हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. एसआयटीच्या माहितीनुसार हे हत्याकांड घडलं तेव्हा आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra) हा देखील घटनास्थळी उपस्थित होता. (Lakhimpur-Kheri violence case: Minister of State for Home Affairs of India ajay mishra son Ashish Mishra main accused)
हे देखील पहा -
आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्रा याच्या आणखी एका नातेवाईकालाही सहआरोपी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र शुक्ला याच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा याच्या थार जीपच्या मागे धावणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वीरेंद्रची स्कॉर्पिओ होती. वीरेंद्र शुक्लाने आधी आपली स्कॉर्पिओ लपवली आणि दुसऱ्याची गाडी असल्याचे सांगितले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व 13 आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला याचेही नाव नव्याने जोडले आहे. वीरेंद्रवर कलम 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वीरेंद्र हा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा नातेवाईक आहे.
३ ऑक्टोबर रोजी लखीमपूरमधील (Lakhimpur Kheri) टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याने आपल्या जीपने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त जमावाने आशिषच्या चालकासह चार जणांची हत्या केली.
याप्रकरणी नुकताच एसआयटीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये लखीमपूरच्या टिकुनिया येथील हिंसाचार हा अपघात नसून हत्येचा नियोजित कट असल्याची ही गंभीर बाब असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तर, शस्त्रास्त्रांसह, गंभीर कट रचून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीवरून कोर्टाने आशिष मिश्रा याच्याविरोधात आणखी कडक कलमे लावली आहेत. याप्रकरणी विरोधकांनी रस्त्यावरून संसदेपर्यंत गोंधळ घातला आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.