Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, आणखी २५० रुपये वाढवून मिळणार; या राज्यातील महिलांना रक्षाबंधनाची भेट

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडली बेहना योजनेतील लाभार्थी महिलांना रक्षाबंधननिमित्त खास गिफ्ट मिळणार आहे. या महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत.
Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, आणखी २५० रुपये वाढवून मिळणार; या राज्यातील महिलांना रक्षाबंधनाची भेट
Ladli Behna YojanaSaam Tv
Published On

मध्य प्रदेशमधील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. या लाडक्या बहिणींना रक्षाबंधननिमित्त सरकारकडून खास गिप्ट मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या हफ्त्यामध्ये २५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना १५०० रुपये हफ्ता मिळणार आहे. या रक्षाबंधनपूर्वी म्हणजेच ७ ऑगस्टला या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये १२५० ऐवजी १५०० रुपये जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली.

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, आणखी २५० रुपये वाढवून मिळणार; या राज्यातील महिलांना रक्षाबंधनाची भेट
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळणार? खात्यात ₹३००० जमा होणार | VIDEO

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घोषणा केली की, येत्या ७ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना या योजनेचा २७ वा हप्ता जारी केला जाईल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, 'लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. २७ व्या हप्त्यातील १२५० रुपये आणि रक्षाबंधनचे गिफ्ट म्हणून २५० रुपये 'लाडली बहना' योजनेच्या लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरित केले जातील.

मध्य प्रदेशमधील 'लाडली बहना' योजनेत नोंदणी केलेल्या बहिणींच्या बँक खात्यात ७ ऑगस्ट रोजी १२५० रुपयांऐवजी १५०० रुपये जमा केले जातील. २५० रुपयांची अतिरिक्त रक्कम रक्षाबंधन सणानिमित्त भेट म्हणून दिली जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी १५०० रुपयेचा हफ्ता १.२६ कोटी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, आणखी २५० रुपये वाढवून मिळणार; या राज्यातील महिलांना रक्षाबंधनाची भेट
Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही १५०० रुपये, तुमचंही नाव आहे का?

रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना १२५० रुपयांव्यतिरिक्त २५० रुपये अतिरिक्त पैसे देण्यासाठी सरकारला ३१७ कोटी ५० लाख रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. यासाठी सरकारने जुलैमध्ये ४३०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. १२ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १.२७ कोटी लाडली बहिणींच्या बँक खात्यात १५४३.१६ कोटी रुपये हस्तांतरित केले होते. या योजनेचा हा २६ वा हप्ता होता. यापैकी ३० लाखांहून अधिक बहिणींना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडर रिफिलिंगसाठी ४६.३४ कोटी रुपयांची अनुदान रक्कम देखील देण्यात आली होती.

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, आणखी २५० रुपये वाढवून मिळणार; या राज्यातील महिलांना रक्षाबंधनाची भेट
Ladki Bahin Yojana: सोलापुरातील ४३० भावांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, महिनाभरात इतक्या लाखांची वसूली होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com