केजरीवालांवरील टीका भोवणार; एकेकाळचे सहकारी कुमार विश्वास अडचणीत

Arvind Kejriwal Vs Kumar Vishwas: पंजाबच्या रोपड जिल्ह्यातील पोलिसांनी कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Kumar Vishwas problems will increase because of comment on Kejriwal
Kumar Vishwas problems will increase because of comment on KejriwalSaam Tv
Published On

चंदीगड: कधीकाळी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले प्रख्यात कवी आणि पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास अडचणीत सापडले आहेत. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याविरोधातच वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी कुमार विश्वास (Kumar Vishwar) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या (Punjab) रोपड जिल्ह्यातील पोलिसांनी कुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस चौकशीसाठी कुमार यांच्या घरीही गेले. (Kumar Vishwas problems will increase because of comment on Kejriwal)

हे देखील पाहा -

काय आहे प्रकरण?

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Elections 2022) वेळी एका मुलाखतीत कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना स्वतंत्र खलिस्तानचे पंतप्रधान व्हायचे आहे, स्वत: अरविंद केजरीवाल यांनी याबाबत आपल्याला सांगितलं आहे," असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण पंजाबसह देशभरातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. इतकंच नाही तर, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंजाबमधील एका रॅलीत कुमार विश्वास यांच्या आरोपांचा उल्लेख करत, केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता.

केजरीवालांनीही दिलं होतं सडेतोड उत्तर

अरविंद केजरीवाल यांनीही कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पराभूत करण्यासाठी, तसेच भगवंत मान (Bhagwant Maan) यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्याचबरोबर 'विकासाबाबत बोलणारा दहशतवादी कधी पाहिला आहे का? जर मी दहशतवादी असेल तर, कदाचित मी जगातील सर्वात गोड दहशतवादी असेल.' असं म्हणत त्यांनी कुमार यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Kumar Vishwas problems will increase because of comment on Kejriwal
उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार; दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

कुमार विश्वास यांचं खास शैलीत ट्विट

पंजाब पोलिसांनी कुमार विश्वास यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच चौकशीसाठी पोलीस त्यांच्या घरीही पोहोचले होते. कुमार यांच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी खास शैलीत ट्विट करून पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा दिला आहे. 'पंजाब पोलीस पहाटेच गेटवर आले आहेत. एकेकाळी माझ्यामुळेच पक्षात आलेल्या भगवंत मान यांना मी इशारा देत आहे की, दिल्लीत बसून ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमची आणि पंजाबची फसवणूक करेल. देशाने मी जे काही म्हणालो आहे, ते लक्षात ठेवावे,' असं कुमार यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com