B.Tech Cab Driver: परदेशातल्या नोकऱ्यांवर लाथ मारून टॅक्सीच्या ब्रेकवर ठेवला पाय; कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात अश्रू दाटतील

Woman Cab Driver: त्यामुळे मी त्यांना विचारले की तुम्ही सुशिक्षित वाटता. पण हे काम का करत आहात.
B.Tech Cab Driver
B.Tech Cab DriverSaam TV
Published On

Kolkata Cab Driver Woman: प्रत्येक मुलगी आपलं शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायांवर उभं राहण्याचं स्वप्न पाहते. आपली स्वप्न कितीही मोठी असली तरी आपल्या आई वडिलांसमोर ही स्वप्न काहीच नाहीत असं म्हणत एका उच्चशिक्षित तरुणीने आपली भरमसाठ पगाराची नोकरी सोडून दिली आहे. (Kolkata News)

परम कल्याण सिंग या व्यक्तीने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये B.Tech Cab Driver असलेल्या महिलेविषयी सांगण्यात आले आहे. सदर घटना ही कोलकत्त्यामधील असून दीप्ता घोष असे या महिलेचे नाव आहे. परम कल्याण सिंग यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे.

B.Tech Cab Driver
Bride Threw Money Viral Video: भावा आपल्याला पण अशीच पाहिजे; भर मांडवात नवरदेवाला पाहून नवरीनं केली नोटांची उधळण

अशात एका मुलीला तिची भरमसाठ पगाराची नोकरी सोडून ड्राव्हरचे काम का करावे लागले हे जाणून घेऊ. सींग यांनी त्या दिवशीचा किस्सा सांगत लिहिलं आहे की, " मी लेक मॉलमध्ये जाण्यासाठी कॅब बूक केली. त्यावेळी तेथून एका महिलेचा फोन आला. नेमकं कुठं जायचं आहे आणि किती पैसे होतील असे कोणतेही प्रश्न न विचारता या महिलेने फक्त पिकअपसाठी कुठे येऊ असे विचारले.

थोड्यावेळात महिला कॅब (Cab) घेऊन आली. त्यानंतर मी कॅबमध्ये बसलो आणि निघालो. त्या महिलेला पाहून आणि तिच्या थोड्याफार बोलण्यावरून महिला सुशिक्षित असणार याची मला कल्पना आली होती. मात्र एवढी माहिती पुरेशी नव्हती. त्यामुळे मी त्यांना विचारले की तुम्ही सुशिक्षित वाटता. पण हे काम का करत आहात.

B.Tech Cab Driver
Pune Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती झाला हैवान; खलबत्याने मारहाण करत दिले गरम हिटरचे चटके

त्यावेळी त्या महिलेने मला जे सांगितले ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. महिलेने म्हटलं की, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर बी टेकमधून माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ६ वर्ष मी या क्षेत्रात नोकरी केली. सर्व छान सुरु होते. मात्र अचानक माझ्या वडलांची तब्येत बिघडली आणि साल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर आमच्या घरी माझी आई आणि माझी बहिण अशा दोघीच राहत होत्या.

माझ्या क्षेत्रातील सर्व नोकऱ्या कोलकत्ता (Kolkata) बाहेरील होत्या. अशा परिस्थितीत मझ्या नोकरी पेक्षा माझ्यासाठी आई आणि बहिण या दोघी महत्वाच्या आहेत. त्यामुळे मी अनेक मोठ मोठ्या नोकऱ्यांच्या संधी सोडल्या. मला आधीपासूनच कार चालवता येत होती त्यामुळे मी उबरसाठी ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरूवात केली. मी रोज ६ ते ७ तास हे काम करते यातून मला दरमहा ४०,००० रुपये कमवता येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com