Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

Jammu Kashmir Kishtwar Cloudburst: जम्मू -काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली. या घटनेमध्ये ६० जणांचा मृत्यू झाला. २०० जण बेपत्ता झाले आहे. या सर्वांचा शोध सुरू आहे.
Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव
Jammu Kashmir Kishtwar Cloudburstx
Published On

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडनंतर जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी झाली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडच्या चशोती भागात ढगफुटी झाल्यामुळे ६० जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सीआयएसएफच्या दोन जवानांचा देखील समावेश आहे. ढगफुटीमुळे २०० जण बेपत्ता झाले आहेत. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आहे.

किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर मचैल माता मंदिर मार्गावर दोन मिनिटांच्या आत दगड आणि मलबा मोठ्या प्रमाणात आला. नागरिकांना पळत जाऊन जीव वाचवण्याची देखील संधी मिळाली नाही. जो ज्याठिकाणी होता तिथेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडला. लोकांना विचार करण्याची संधी देखील मिळाली नाही. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन, बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू ऑपरेशन करून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले. या घटनेत १०० जण जखमी झाले. जखमींमधील ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि पड्डार उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव
Jammu Kashmir Cloudburst: किश्तवाडमध्ये पुन्हा ढगफुटी; 10 जणांचा मृत्यू,बचाव कार्य सुरू

मचैल माता मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील चशोती गावात गुरूवारी दुपारच्या सुमारास ढगफुटी झाली. मचेल माता मंदिरात यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले होते. या दुर्घटनेत ६० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २०० जण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात आहे.

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव
Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, एन्काउंटरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

मचैल माता मंदिर ९५०० फूट उंचीवर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना छशोती गावापर्यंत वाहनाने जावे लागते. त्यानंतर त्यांना ८.५ किलोमीटरपर्यंत पायी चालत जावे लागते. प्रशासनाने या ढगफुटीनंतर अलर्ट जारी केला आहे. घटनास्थळावर सर्च लाईट, दोरी आणि खोदकामासाठी लागणारी अवजारे आणली जात आहेत. या मचैल मातेची यात्रा २५ जुलैपासून सुरू झाली होती. ही यात्रा ५ सप्टेंबरपर्यंत संपणार होती. पण त्यापूर्वीच ढगफुटीची घटना घडली.

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव
Jammu Drone Attack : पाकड्यांचा भारतावर हल्ला; गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे ८ जवान जखमी, घटनास्थळी स्थिती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com