हृदयद्रावक! दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, विसर्जनाहून परतताना ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

Madhya Pradesh, Khandwa Tragedy : मध्य प्रदेशातील खंडवामध्ये दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली. देवीच्या मूर्ती विसर्जनानंतर घरी परतताना ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून नदीत कोसळली. यात १४ हून अधिक जण नदीत बुडाले. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील खंडवामध्ये मोठी दुर्घटना, ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळून १० भाविकांचा मृत्यू
madhya Pradesh Khandwa Incidentsaam tv
Published On
Summary
  • मध्य प्रदेशातील खंडवामध्ये दुर्दैवी घटना

  • विसर्जनाहून परतताना ट्रॉली नदीत कोसळली

  • १० भाविकांचा मृत्यू, काही जण बेपत्ता

मध्य प्रदेशातील खंडवा येथे दसऱ्याच्या दिवशीच हृदयद्रावक घटना घडली. विसर्जनाहून परतताना भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून नदीपात्रात कोसळली. पंधाना ठाण्याच्या हद्दीत जमाली नजीक आबना नदीत ही घटना घडली. या घटनेत १४ जण नदीत बुडाले. त्यातील १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

खंडवा जिल्ह्यात गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी अपघात झाला. मूर्ती विसर्जित करून घरी परतणाऱ्या भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला. तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडलाफाडा ग्रामपंचायत हद्दीतील काही गावकरी गुरुवारी दुर्गा मातेच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गेले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीत २५ भाविक बसले होते. जमालीजवळ आबना नदीवरील पुलावरून ते जात होते. अचानक भाविकांसह ट्रॉली पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सात ते आठ लहान मुले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

पंधाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरदला कला गावाच्या परिसरात ही दुर्घटना घडली. नवरात्रौत्सवानंतर आज गावातील नागरिक आबना नदीत देवीच्या मूर्ती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करून परतताना ट्रॅक्टर ट्रॉली आबना नदीत कोसळली. ट्रॉलीमध्ये २० ते २५ भाविक होते. नदीत कोसळल्यानंतर सर्व जण आरडाओरडा करू लागले. काही वेळ घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

मध्य प्रदेशातील खंडवामध्ये मोठी दुर्घटना, ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळून १० भाविकांचा मृत्यू
Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

नदीच्या काठावर विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी घटनास्थळी गर्दी केली होती. नदीत बुडालेल्या काही भाविकांना वाचवण्यात यश आले. तर जवळपास १४ जण बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले. बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत १० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यात लहान मुले अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील खंडवामध्ये मोठी दुर्घटना, ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळून १० भाविकांचा मृत्यू
Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com