Amritpal Singh : पंजाबला हादरवणारा अमृतपाल सिंग फरार; महाराष्ट्रात का दिलाय अलर्ट, काय आहे शक्यता?

Amritpal Singh fleeing : पंजाब हादरवणाऱ्या अमृतपालचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर तो फरार झाला आहे.
Amritpal Singh
Amritpal SinghSAAM TV
Published On

Amritpal Singh fleeing : 'वारिस पंजाब दे'चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पंजाब हादरवणाऱ्या अमृतपालचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर तो राज्यातून फरार झाला आहे. तो हरयाणात गेल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच तिथं त्याला आश्रय देणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, अमृतपाल हा महाराष्ट्रातील नांदेडमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमृतपाल महाराष्ट्रातील (Maharashtra) नांदेडमध्ये लपला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, महाराष्ट्र पोलीस अलर्टवर आहेत. त्यानंतर शहरातील सर्व रस्ते, शहरातील आणि शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना दिल्याचे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमंतल, नांदेड ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेला अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Amritpal Singh
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थकांकडून तिरंग्याचा अपमान; उच्चायुक्त कार्यालयाबाहेर अमृतपाल सिंगच्या समर्थनात घोषणाबाजी

अमृतपालला आश्रय देणाऱ्या महिलेला अटक

पंजाब पोलिसांच्या हातातून खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) निसटला आहे. त्याच्यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे.

१८ मार्चला फरार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो हरयाणात होता. तिथे एका निकटवर्तीयाच्या घरी थांबला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तेथून निघून गेला.

हरयाणा पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेला अटक (Arrest) केली आहे. कुरुक्षेत्र जिल्ह्यातील आपल्या घरात अमृतपालला आश्रय दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. अमृतपाल तिथे आपला आणखी एक साथीदार पापलप्रीतच्या सोबत आला होता.

१९ आणि २० मार्चला तो शाहबादमधील सिद्धार्थ कॉलनीत थांबला होता. महिलेकडे चौकशी केली जात आहे. तो उत्तराखंड किंवा महाराष्ट्रात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amritpal Singh
Modi Poster news : ‘मोदी हटाओ देश बचाओ’ दिल्लीत जागोजागी बॅनरबाजी; ६ जणांना अटक तर १०० हून अधिक FIR दाखल

दरम्यान, अमृतपालला आश्रय देणाऱ्या महिलेला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे कळते. संबंधित महिला आणि अमृतपाल हे दोघे अडीच वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे.

विदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात?

रिपोर्टनुसार, अमृतपाल दिल्लीतही जाऊ शकतो. तिथे तो बनावट पासपोर्टवर परदेशात पळून जाऊ शकतो किंवा ट्रेनमधून बिहार-नेपाळ सीमेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकतो. पंजाब पोलिसांच्या सूचनेनंतर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय तपास संस्थांना अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com