Accident News : तरुणाचं दुचाकीवरच नियंत्रण सुटलं, धावत्या स्कूल बस खाली आला अन्... | Video Viral

Kerala Accident Viral Video News : केरळच्या मलप्पुरममध्ये धावत्या स्कुलबसखाली आलेल्या तरुणाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Accident News : तरुणाचं दुचाकीवरच नियंत्रण सुटलं, धावत्या स्कूल बस खाली आला अन्... | Video Viral
Kerala Accident Viral Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • केरळमधील वर्दळीच्या रस्त्यावर थरकाप उडवणारा अपघात

  • दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरुण स्कुलबसखाली

  • बसचालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

  • सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

केरळमध्ये एका तरुणाच्या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरुण धावत्या स्कुलबस खाली आला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बसचालकाच्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील पजामल्लूर येथील एका वर्दळीच्या रस्त्यावर घडला आहे. स्कुलच्या बसच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. इतक्यात समोरून येणाऱ्या स्कुल बसखाली हा तरुण आला.

Accident News : तरुणाचं दुचाकीवरच नियंत्रण सुटलं, धावत्या स्कूल बस खाली आला अन्... | Video Viral
Pune Crime News : पहिल्या मजल्यावर फ्लॅटमध्ये सुरू होता भयंकर प्रकार; धाड टाकल्यानंतर रूममधलं दृश्य बघून सगळेच हादरले

मात्र बसचालकाने सतर्क राहून तात्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने, या घटनेत विद्यार्थ्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे.

Accident News : तरुणाचं दुचाकीवरच नियंत्रण सुटलं, धावत्या स्कूल बस खाली आला अन्... | Video Viral
Kalyan : ठाकरे गटाचे ‘बेपत्ता’ नगरसेवक शिंदेंसेनेच्या मंचावर, कुठे होते? विचारताच काढला पळ, कल्याणच्या राजकारणात नेमकं काय घडतेय?

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यावर वाहन काळजीपूर्वक न चालवल्यास मोठा अपघात होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com