Kedarnath Dham : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींगँ; पायलटच्या प्रसंगावधानाने बचावले भाविक

Kedarnath Dham News : वैमानिकाच्या प्रसंगावधानानं केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली. केदारनाथ धामला जाणाऱ्या क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरला शुक्रवारी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
Kedarnath Dham
Kedarnath Dham Saam Digital

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

बातमी आहे केदारनमध्ये घडलेल्या थराराची..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताचा थरार पाहायला मिळाला..केदारनाथमध्ये भाविकांना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर पुढे काय घडलं तुम्हीच पाहा...

वैमानिकाच्या प्रसंगावधानानं केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली. केदारनाथ धामला जाणाऱ्या क्रिस्टल एव्हिएशन हेलिकॉप्टरला शुक्रवारी सकाळी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, ज्यामुळे सिरसीहून केदारनाथ धामला गेलेल्या 6 जणांचे प्राण वाचले.

हेलिकॉप्टर केदारनाथ धाम हेलिपॅडवर लँड करत होतं, मात्र अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं. हेलिकॉप्टर स्टॉल म्हणजेच ते एका जागी स्थिर झाल्याचं दिसंतय. हेलिकॉप्टरचे रोटर फिरत नव्हते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतर हेलिकॉप्टर एखाद्या कागदी बाणासारख झोकांड्या घेऊ लागलं. हेलिकॉप्टर कधी पुढे तर कधी मागे जात होतं. एक क्षण असं वाटतं आता हेलिकॉप्टर क्रॅश होणार, पण हेलिकॉप्टर सुरक्षित लँड होतं. थरारक दृष्य पाहताना काळजाचा ठोका चूकला होता.

Kedarnath Dham
Kedarnath Helicopter emergency landing : घिरट्या आणि हेलकावे घेत हेलिकॉप्टर खाली आलं; केदारनाथमधील इमर्जन्सी लँडिंगचा थरारक VIDEO

हेलिकॉप्टरमध्ये यावेळी 6 भाविक होते..पायलटनं वेळीच प्रसंगावधान राखलं नसतं तर होत्याचं नव्हतं झालं असतं. पण ते म्हणतात न काळ आला होता पण वेळ नाही. त्यामुळे पायलटसह सर्व प्रवासी थोडक्यात बचावलेत. हेलिकॉप्टरच्या सुरक्षित लँडिंगनंतर प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. 10 मे पासून चार धाम यात्रा सुरू झाल्यापासून केदारनाथ धाममध्ये यात्रेकरूंचं सातत्यानं आगमन होतय. केदारनाथ धाममध्ये दररोज सरासरी 25 हजारांहून अधिक भाविक पोहोचतायत.. 9 हेलिकॉप्टर कंपन्या यात्रेकरूंना धाममध्ये घेऊन जात आहेत. अशा स्थितीत या घटनेने यात्रेकरूंची चिंता वाढली आहे.

Kedarnath Dham
Hit and Run Video: भरधाव कारच्या धडकेत तरुण 20 फूट उंच हवेत उडाला, थरारक CCTV व्हिडिओ आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com