Paid Menstrual Leave: सरकारीच नव्हे, खासगी क्षेत्रातही महिलांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी

Paid Period Leave In Private And Government Sector: कामावर जाणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी. महिलांना मासिक पाळीत भरपगारी रजा मिळणार आहे.
Women employees celebrate Karnataka government’s historic decision to grant paid menstrual leave across all sectors.
Women employees celebrate Karnataka government’s historic decision to grant paid menstrual leave across all sectors.Saam Tv
Published On

बिहार राज्याच्या पावलावर पाऊल टाकत, आता कर्नाटक सरकारनेही महिलांना मासिक पाळीच्या काळात 'भरपगारी रजा' देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे! या ऐतिहासिक निर्णयानुसार, कर्नाटक राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना आता दर महिन्याला एक दिवसाची 'पेड लिव्ह' म्हणजेच वर्षाला एकूण बारा सुट्ट्या मिळणार आहेत.

या निर्णयाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा नियम केवळ सरकारी क्षेत्रासाठीच नाही... तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांनाही लागू होणार आहे. आयटी कंपन्या असोत, कारखाने असोत किंवा इतर कोणतंही खासगी कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांना मासिक पाळीदरम्यान एक दिवसाची भरपगारी रजा घेण्याचा हक्क मिळाला आहे.

मासिक पाळीच्या वेदना आणि अस्वस्थता यांचा विचार करून घेतलेला हा निर्णय, कामाच्या ठिकाणी महिलांसाठी अधिक सकारात्मक आणि समावेशक वातावरण निर्माण करेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com