I'm unstoppable, निवडणूक निकालांदरम्यान काँग्रेसने राहुल गांधींचा व्हिडीओ केला शेअर

I'm unstoppable, निवडणूक निकालांदरम्यान काँग्रेसने राहुल गांधींचा व्हिडीओ केला शेअर
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam TV

Karnataka Assembly Election Result 2023  : कर्नाटकातील सर्व 224 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. निवडणुकीच्या निकालामुळे काँग्रेस पक्षात आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.

यातच काँग्रेसने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ची काही फोटो एकत्र करून 'I'm unstoppable' या गाण्यावर एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. निवसणुकीत राहुल आणि प्रियंका गांधी भाजपच्या विरोधात खूप आक्रमकपणे प्रचार केला होता.

Rahul Gandhi
Karnataka Assembly Election Result 2023 : बहुमताचा आकडा दिसताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ, सिद्धरामय्या यांच्या मुलाने ठोकला दावा

काँग्रेसने व्हिडीओ ट्विट करून लिहिले की, “I'm invincible. I'm so confident. Yeah, I'm unstoppable today.” काँग्रेसने व्हिडीओ ट्विट करून लिहिले की, “मी अजिंक्य आहे. मला स्वतःवर विश्वास आहे. होय, आज मला कहाणीही थांबू शकता नाही.” (Latest Marathi News)

Balasaheb Thorat On Karnataka Assembly Election Result 2023  : भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक निवडणुकीत दिसला : बाळासाहेब थोरात

कर्नाटक (Karnataka)  निकालांवर काँग्रेसने नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''प्राथमिक कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून देशाची इच्छा आहे की काँग्रेसचा विजय व्हावा. ऑपरेशन लोटस तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही. हे या कलांवरून समोर आलंय. भविष्याच्या राजकारणात लोकशाही टिकवायची असेल तर कर्नाटकचा आजचा निकाल खूप महत्त्वाचा आहे.''

Rahul Gandhi
Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकचे सुरुवातीचे‌ कल आले; काँग्रेसला स्पष्ट बहुमत, भाजपचे स्वप्न भंगले

ते म्हणले, ''आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा मिळतोय हेच यावरून स्पष्ट होतं.'' थोरात पुढे म्हणाले की, ''भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना आहे. भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक निवडणुकीत निश्चितपणे दिसला आहे.''

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com