Suhas Shetty Death Case : सुहास शेट्टी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांची मोठी कारवाई; ८ जणांना अटक

Suhas Shetty Murder Case : सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Suhas Shetty Murder Case
Suhas Shetty Murder CaseSaam Tv News
Published On

मंगळुरु : कर्नाटकमधील मंगळुरूमध्ये बजरंग दलाचे माजी सदस्य सुहास शेट्टी यांची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ८ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुहास शेट्टी हे एका कारमधून जात होते. यावेळी त्याच्याबरोबर आणखी काही जण देखील होते. याचवेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Suhas Shetty Murder Case
मोठ्या बहिणीनं बॉयफ्रेंडकडून दोन बहिणींवर अत्याचार केला, आजीसमोर बिंग फुटलं; ओरडा बसताच तरुणीनं भयंकर पाऊल उचललं

सुहास शेट्टींच्या गाडीला दोन गाड्यांनी अडवलं. त्यानंतर दोन वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांनी शेट्टींवर तलवार आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुहास शेट्टी गंभीर जखमी झाले. यानंतर जवळच्या एका रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान सुहास शेट्टींचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, सुहास शेट्टींची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत गुन्हा दाखल केला होता. तसेच आरोपींच्या अटकेसाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली होती. तसेच शेट्टींच्या हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी शरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले, सार्वजनिक मेळावे, मिरवणुकांवर ६ मे पर्यंत बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Suhas Shetty Murder Case
शरीरसंबंधावेळी पत्नीचा मृत्यू, जिम ट्रेनरचा दावा; पोस्टमार्टेम रिपोर्टने बिंग फुटलं, मृत्यूचं गूढ उकललं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com