Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात, पाहा VIDEO

CM Siddaramaiah Viral Video: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत पोलिस अधिकाऱ्यावर हात उगारत कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे.
Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात, पाहा VIDEO
Karnataka CM Siddaramaiah VideoSaam Tv
Published On

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जनता दल सेक्युलरने एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलामध्ये मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी बेळगाव येथे एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक नारायण भारमाणी यांच्यावर हात उगारत त्यांच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा निषेध केला जात आहे.

सिद्धरामय्या भाषण देण्यासाठी उभे राहतात आणि त्याचवेळी गर्दीत उपस्थित असलेल्या भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे देखील दाखवले होते. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले होते. यावेळी ते सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एएसपी नारायण भारमाणी यांच्यावर संतापले. भाषण सुरू करण्यापूर्वी ते एएसपींवर कशाप्रकारे चिडले या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात, पाहा VIDEO
Shocking News: मुलाच्या आत्महत्येचे दु:ख सहन झालं नाही, आईनेही टोकाचं पाऊल उचलत संपवलं आयुष्य

संतप्त झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्यायांनी स्टेजवरूनच एएसपीला सांगितले 'तुम्ही कोणीही असाल, इथे या.' जेव्हा एएसपी भारमणी स्टेजवर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारले 'तुम्ही काय करत होता?' त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्यावर हात उगारला आणि त्यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस अधिकारी मागे सरकला त्यामुळे सिद्धरामय्या थांबले. सिद्धरामय्या यांच्या या कृत्यानंतर भाजप आणि जनता दल सेक्युलरसह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात, पाहा VIDEO
Shocking News: ५० वर्षीय आजीनं नातवासोबतच केलं लग्न, ४ मुलं अन् नवऱ्याला सोडून पळाली

जनता दल सेक्युलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर सिद्धरामय्या यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी असे म्हटले आहे की, "सिद्धरामय्या तुम्हाला सत्तेचा अहंकार आहे. एएसपीला मारण्यासाठ हात उचलणे हे तुमच्या भूमिकेला शोभत नाही. तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि रस्त्यावरील गुंडाप्रमाणे एएसपीला मारण्याचा प्रयत्न केला. हे माफी मागण्यासारखे नाही. तुमचा कार्यकाळ फक्त ५ वर्षांचा आहे पण सरकारी अधिकारी वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत सेवा करतो. सत्ता कायमस्वरूपी नसते, तुमचं वागणं सुधारा.' सध्या सिद्धरामय्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Karnataka CM Siddaramaiah: मुख्यमंत्र्यांनी भरसभेत पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात, पाहा VIDEO
Shocking News: बायकोसाठी गिफ्ट आणायला गेला, परत आलाच नाही; लग्नानंतर २४ तासांत कंकू पुसलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com