Political News: भाजपाकडून पुन्हा ऑपरेशन लोटसची तयारी, आमदारांना ५० कोटींची ऑफर; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Karnataka Politics News: काँग्रेसचे आमदार (Congress Mla) फोडण्यासाठी भाजपने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
Karnataka Politics News
Narendra Modi Amit Shah Saam Tv
Published On

BJP Operation Lotus Siddaramaiah Allegations

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून राजकीय नेते प्रचारसभा घेत आहेत. केंद्रातील मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. दुसरीकडे 'अबकी बार ४०० पार' असा नारा एनडीएने दिला आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

Karnataka Politics News
Breaking News: भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीतून CM शिंदे अन् अजित पवारांचं नाव वगळलं; समोर आलं मोठं कारण

कर्नाटकात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे आमदार (Congress Mla) फोडण्यासाठी भाजपने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली.

या मुलाखतीत त्यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजप दक्षिणेकडील राज्यात ऑपरेशन लोटस चालवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी त्यांनी ५० कोटींची ऑफर दिली होती. परंतु आमचे आमदार फुटणार नाहीत. ते काँग्रेस सोडणार नाही, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. याठिकाणी जर काँग्रेसचा पराभव झाला, तर काँग्रेसचे राज्यातील सरकार पडणार का? असा सवाल सिद्धरामय्या यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, नाही हे शक्य नाही. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे आमदार आम्हाला सोडणार नाहीत.

आमचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही. गेल्या वर्षभरापासून भाजप आमदार फोडण्याचा प्रयत्न करतंय, असंही सिद्धरामय्या म्हणाले. दुसरीकडे सिद्धरामय्या यांनी केलेल्या आरोपाचं भाजपने खंडण केलंय. समाजातील एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी सिद्धरामय्या वारंवार असे आरोप करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं भाजप खासदार एस. प्रकाश यांनी म्हटलं आहे.

Karnataka Politics News
Politics News: मोदी पूर्णपणे अपयशी पंतप्रधान, विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे; ठाकरे गटाची बोचरी टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com