Kanwar Yatra Case: 'कावड मार्गावर नेमप्लेट लावण्यास स्थगिती', सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला धक्का; मध्यप्रदेशसह २ राज्यांना पाठवली नोटीस

Kanwar Yatra Row In Supreme Court: "अशा आदेशाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट करत हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचवणारा प्रकार आहे, जो राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा भाग आहे असं कोर्टाने म्हटले.
Kanwar Yatra Case: 'कावड मार्गावर नेमप्लेट लावण्यास स्थगिती', सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला धक्का; मध्यप्रदेशसह २ राज्यांना पाठवली नोटीस
Supreme CourtSaam TV
Published On

दिल्ली, ता. २२ जुलै २०२४

उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील ल खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक या योगी सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणी एका एनजीओच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे.

Kanwar Yatra Case: 'कावड मार्गावर नेमप्लेट लावण्यास स्थगिती', सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला धक्का; मध्यप्रदेशसह २ राज्यांना पाठवली नोटीस
Vijay Wadettiwar: 'मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना, भाजप नगरसेवकाला दिले ४०० कोटी', विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक आरोप!

उत्तर प्रदेशातील कावड मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर नेम प्लेट्स लावणे बंधनकारक आहे असा मोठा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला होता. कावड यात्रेकरूंच्या श्रद्धेच पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे म्हणत पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते.

योगी सरकारच्या या निर्णयाविरोधात एका सामाजिक संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती हृषिकेश राय आणि न्यायमूर्ती एसव्ही एन भट्टी यांच्यापीठासमोर ही सुनावणी पार पडली. यामध्ये राज्य सरकारने पुढील सुनावणी होईपर्यंत या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Kanwar Yatra Case: 'कावड मार्गावर नेमप्लेट लावण्यास स्थगिती', सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला धक्का; मध्यप्रदेशसह २ राज्यांना पाठवली नोटीस
Pune News: शासन मान्यता न घेताच भरवली शाळा, पुण्यातील धक्कादायक प्रकार; अध्यक्ष, संचालकांवर गुन्हा

तसेच सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला नोटीस जारी केली असून शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी २६ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत दुकानदारांना दुकानावर नाव लिहण्याची गरज नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

सुनावणीवेळी महुआ मोएत्रा यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यात्रा अनेक दशकांपासून होत असून यात्रेदरम्यान सर्व धर्माचे लोक मदत करत आहेत. कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामागे काय तर्क असू शकेल? असा सवाल उपस्थित केला. यावेळी अशा आदेशाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे स्पष्ट करत हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचवणारा प्रकार आहे, जो राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा भाग आहे असं कोर्टाने म्हटले.

Kanwar Yatra Case: 'कावड मार्गावर नेमप्लेट लावण्यास स्थगिती', सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला धक्का; मध्यप्रदेशसह २ राज्यांना पाठवली नोटीस
Maharashtra Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकलाय; वाघनखांची उठाठेव कसली करताय, 'सामना'तून जहरी टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com