Chief Justice of India : न्यायमूर्ती सूर्यकांत ५३ वे सरन्यायाधीश, कार्यकाळ १५ महिन्यांचा

CJI Surya Kant News : भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नवी दिल्लीत शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न झाला.

53nd Chief Justice of India Judge Surya Kant : न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांचा CJI म्हणून कार्यकाळ १५ महिने असेल. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या वेळी त्यांनी कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पदाची शपथ दिली.

'मी भारताचे सार्वभौमता आणि अखंडता अबाधित ठेवेन आणि आपले कर्तव्य भीती किंवा पक्षपात, अनुराग किंवा द्वेष याशिवाय पार पाडेन,' अशी शपथ त्यांनी घेतली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असेल. त्यांनी आपल्या संपूर्ण क्षमतेने, ज्ञानाने आणि विवेकाने पदाच्या कर्तव्यांचे पालन करण्याचे वचन दिले आहे. ते संविधानाच्या आणि कायद्याच्या मर्यादांचे पालन करतील असेही त्यांनी आपल्या शपथेमध्ये नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com