Journalist Soumya Vishwanathan Case: पत्रकार सौम्या विश्वनाथन खून प्रकरणातील सर्व आरोपी दोषी, २६ ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

Court News: पत्रकार सौम्या विश्वनाथनची ३० सप्टेंबर २००८ मध्ये हत्या करण्यात आली होती
Journalist Soumya Vishwanathan Case
Journalist Soumya Vishwanathan CaseSaam Digital
Published On

Journalist Soumya Vishwanathan Case

टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील सर्व ५ आरोपींना साकेत न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. २६ ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी होणार असून आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजित मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

२००८ मध्ये झालेल्या या हत्या प्रकरणावर १३ ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निकाल राखून ठेवला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रविंद्र कुमार पांडे यांनी, १८ ऑक्टोबरला सुनावणी घेण्यासाठी आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. ६ ऑक्टोबर रोजी बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली होती. दरम्यान या प्रकरणातील पाचव्या आरोपीलाही इतर गुन्ह्यामध्ये दोषी ठरविण्यात आले आहे.

Journalist Soumya Vishwanathan Case
UP: आझम खान, मुलगा अब्दुल्ला आणि पत्नीला ७ वर्षांची शिक्षा: रामपूर कोर्टाचा निर्णय

पत्रकार सौम्या विश्वनाथनची ३० सप्टेंबर २००८ मध्ये हत्या करण्यात आली होती. कारमधून घरी परतत असताना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यात तिचा मृत्यू झाला होता. लूटमार करण्याच्या उद्देशाने पत्रकाराची हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर २००९ पासून या प्रकरणातील सर्व आरोपी कारागृहात आहेत. मलिक, अमित शुक्ला, रवी कपूर या आरोपींना २००९ मध्ये आयटी प्रोफेशनल जिगिशा घोष हत्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. याच प्रकरणातून पत्रकार सौम्या विश्वनाथन खूनाचे धागेदोरे हाती आले होते.

जिगिशा घोष चा मृतदेह सौम्या विश्वनाथनच्या हत्येनंतर एक महिन्याने फरिदाबादमध्ये सापडला होता. या प्रकरणात काही शस्त्र हस्तगत करण्यात आली होती. याची चौकशी सुरू असताना पोलिसांना याचे धागेदोरे वसंतविहार खून प्रकरणाशी असल्याचं समजलं. यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

Journalist Soumya Vishwanathan Case
Bengaluru Fire Video: कोरमंगलामधील पबला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या ४ मजल्यावरून व्यक्तीने मारली उडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com