Video : महिला पत्रकाराने कॅमेऱ्यासमोर मुलाच्या कानशिलात लगावली; मुलाने काय केलं होतं, पाहा

Journalist Maira Hashmi Slapped Video : कॅमेऱ्यासमोर कानशिलात लगावल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
Journalist Maira Hashmi Video
Journalist Maira Hashmi VideoTwitter/@MairaHashmi7
Published On

इस्लामाबाद, पाकिस्तान: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. यात एक महिला पत्रकार (Female Pakistani journalist ) लाईव्ह रिपोर्टींग करताना अचानाक एका मुलाच्या कानशिलात लगावते. कॅमेऱ्यासमोर कानशिलात लगावल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे, तसेच या महिला पत्रकाराने त्या मुलाच्या कानशिलात का लगावली असेल असे अनेक प्रश्न नेटीझन्सने उपस्थित केले आहेत. या सर्व प्रकाराबाबत महिला पत्रकाराने आपली बाजू मांडत त्या मुलाच्या कानाखाली का वाजवली याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Journalist Maira Hashmi Slapped News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आणि व्हिडिओ आपला शेजारील देश पाकिस्तानमधला आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या या महिला पत्रकाराचं नाव मारिया हाश्मी (Maira Hashmi) असून ती एका पाकिस्तानी वृत्तवाहिनासाठी काम करते. बकरी ईदच्या निमित्ताने मारिया ही लाईव्ह रिपोर्टींग करत होती. दर्ग्याच्या बाहेर ती लोकांच्या बाईट्स (प्रतिक्रिया) घेत होती. रिपार्टींग करत असताना मारियाच्या आजू-बाजूला लहान मोठ्या अशा सर्व वयोगटातील लोकं ऊभे होते. यावेळी कॅमेऱ्यासमोर बोलताना मारियाने अचानक एका मुलाला थोबाडीत मारली, यामुळे मोठा गोंधळ झाला. या घटनेने ट्विटरवर खळबळ उडाली आहे.

व्हिडीओमध्ये, महिला पत्रकाराच्या भोवती स्थानिक लोकं जमलेले दिसातात. मात्र, तिची लाईव्ह रिपोर्टींग संपताच तिने तिच्या शेजारी उभ्या असलेल्या पांढऱ्या शर्टातील एका तरुण मुलाला चापट मारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती कॅमेर्‍यसमोर रिपोर्टींग करत असताना तिला हेलपाटे मारल्याबद्दल तिने मुलाला चापट मारली. या घटनेने ट्विटरवर विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी महिला पत्रकाराच्या समर्थनार्थ ट्विट केले की, "मुलाने गैरवर्तन केले असावे." तर दुसर्‍या अकाऊंटने ट्विट केले आहे, "तिच्या चेतावणीनंतरही हा मुलगा तिला वारंवार त्रास देत आहे असे दिसते. याबाबत मारिया हिने स्वतः खुलासा केला आहे.

Journalist Maira Hashmi Video
सारा अली खान 'या' अभिनेत्याला डेट करू इच्छिते; करणच्या शोमध्ये केला खूलासा

पाकिस्तानी महिला पत्रकार मारिया हाश्मी हिने स्पष्टकरण दिले आहे, मारिया म्हणाली की, हा मुलगा मुलाखतीदरम्यान कुटुंबाला त्रास देत होता, ज्यामुळे कुटुंब अस्वस्थ झाले. मी प्रथम प्रेमाने समजावून सांगितले की, हे करू नका परंतु तरीही त्याने ऐकलं नाही आणि तो खूप आवाज करत होता. त्यानंतर मला असं करावं लागलं असं स्पष्टीकरण या महिला पत्रकाराने दिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com