नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादाशी संबंधित एख महत्वपूर्ण बैठक बोलावली. या बैठकीदरम्यान, जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दशहतवादी आणि सुरक्षाबलादरम्यान तुफान धुमश्चक्री सुरु आहे. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ४८ राष्ट्रीय रायफल्सचे एक कॅप्टन शहीद झाले. सैन्य दलाने याबाबत माहिती दिली आहे. तसेच या चकमकीत ४ दहशतवाद्यांचाही खात्मा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षा दलाने शिवगड-अस्सार पट्ट्यात लपलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाला घेरलं. या पट्ट्यात सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन राबवलं जात आहे. घनदाट जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवाद्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.
जवानांनी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेली एम-४ रायफल आणि ३ बॅग सापडल्या. पटनीटॉपजवळी जंगलात या चकमकीला सुरुवात झाली होती. भारतीय सैन्य दलाने या ऑपरेशनचं नाव 'अस्सर' ठेवलं आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दहशतवादी अस्सरच्या एका नदीजवळ लपले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळेच्या अंतराने गोळीबार होत होता. रात्रीही जवानांनी दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. दिवस सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा शोध सुरु केला. आझ सकाळी ७.३० वाजता गोळीबार सुरु झाला.
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेवरून दिल्लीत उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सुरक्षा सचिव गिरिधर अरमाने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, लेप्टिनंट जनरल प्रतीक शर्मा आणि सुरक्षेसंबंधित संस्थेचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्ष दलाच्या जवानांना हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.