उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह,चिठ्ठीतून उलगडणार सत्य

LG Manoj Sinhas Grandson Killed himself: जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचा नातवाने आत्महत्या केली आहे. कानपूरमध्ये नातू मृतावस्थेत आढळलाय. पोलिसांनी त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट जप्त केली आहे.
LG Manoj Sinhas Grandson Killed himself
Kanpur police recover suicide note after Manoj Sinha’s grandson found dead; investigation underway.saam tv
Published On
Summary
  • मनोज सिन्हा हे जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आहेत.

  • मनोज सिन्हा यांच्या नातवाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • सुसाईड नोट जप्त करून पोलिसांनी तपास सुरू केलाय.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नातवाने कानपूरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांना मनोज सिन्हा यांच्या नातवाच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून आहे.

LG Manoj Sinhas Grandson Killed himself
Shocking Crime News : भरदिवसा व्यावसायिकाचं अपहरण, सराफाला नग्न करून मारहाण, ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटली

चिठ्ठी मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याचा मोबाईल तपासला. त्यातून तो बऱ्याच दिवसापासून चिंतेत होता. काही दिवसापूर्वी त्याला स्वप्न पडले होते. त्यात तीन-चार लोक त्याला त्याच्या कुटुंबाला इजा पोहोचवायला किंवा आत्महत्या करायला सांगत होते, असं इतर लोक सांगत होते. दरम्यान आत्महत्येच्या घटनेच्या वेळी आरवचे आईवडील छठपूजेसाठी भागलपूरमध्ये होते. तर त्याची बहीण विद्यापीठात होती.

LG Manoj Sinhas Grandson Killed himself
Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला दार बंद दिसले. तिने शेजाऱ्यांना कळवले, शेजारी आत गेले तेव्हा त्यांना आरवचा मृतदेह दिसला. आरवचे वडील जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि आरव त्यांचा नातू असल्याचे सांगितलं जात आहे. कोहना पोलीस स्टेशनचे प्रभारी विनय तिवारी म्हणाले की, आरवच्या मोबाईल फोनच्या नोटपॅडवर इंग्रजीत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे.

फॉरेन्सिक टीमने त्याचा मोबाईल फोन जप्त केला आहे. कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. आरव हा राज्यस्तरीय जलतरणपटू होता आणि त्याने आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये त्याच्या शाळेच्या वतीने स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com