Jaipur Hit and Run News : जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील परकोटा येथे सोमवारी रात्री साडेनऊ वजता अपघात झाला. दारूच्या नशेत एका व्यक्तीने कार भरधाव वेगाने ९ जणांना उडवले. रस्त्याच्या बाजूला असणार्या गाड्या उडवले. अपघात झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर चालक फरार झाला होता, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आज सकाळी उपचारावेळी एकाचा मृत्यू झाला. इतर ६ जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू होते.
दारूच्या नशेत कार चालणाऱ्या आरोपीचे नाव उस्मान खान (55 वर्ष) असे आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उस्मान खान हा काँग्रेसचा नेता आहे. त्याच्यावर जयपूर काँग्रेसने कारवाई केली असून पक्षातून निलंबित केलेय. उस्मान खान याने दारूच्या नशेत कार पळवत ९ जणांना चिरडले.
पोलिसांनी काय सांगितले ?
शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेला कार चालक उस्मान खान (55 वर्ष) याला अटक करण्यात आल्याचे डीसीपी राशि डोगरा डुडी यांनी सांगितलं. चालक नशेत धुंद होता. चालकाला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांचा राग शांत झाला. आरोपी चालक उस्मान खान याचा विश्वकर्मा येथे लोखंडी कारखाना असल्याचं तपासात समोर आलेय.
दुचाकी जोरदार घासली, ठिणगी उडाली -
दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या चालकाने सर्वप्रथम नाहरगढ स्टेशन चौकात स्कूटी आणि एका पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर त्याने कार संतोषी माता मंदिराच्या दिशेने वेगात पळवली. तिथे त्याने बाइक आणि आणखी एकाला धडकावले. त्यानंतर काही अंतरावर आणखी एका व्यक्तीला धडक दिली आणि कार सोडून तो पळून गेला. या अपघातात कारने ९ लोकांना चिरडले. भीषण अपघाताच्या या घटनेत कारच्या पुढे एक बाइक अडकली होती. बाइक अडकूनही चालकाने कार पळवली, ज्यामुळे रस्त्यावर ठिणग्या उडाल्या अन् लोकांमध्ये भीती वातावरण पसरले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.