Singaporean Crime News: कोरोना पॉझिटिव्ह असूनही मास्क काढून सहकाऱ्यांवर खोकला; आता भोगतोय गंभीर परिणाम, वाचा नेमकं काय घडलं?

Jailed For Coughing On Colleagues: कोरोना नियमांचे पालन न केल्याने सिंगापूरमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला २ आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Singaporean Crime News
Singaporean Crime NewsSaam TV
Published On

Singaporean:

कोरोना महामारीचे आता नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण या काळात कोरोनाची लागण झाल्याने अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली आहेत. कोणालाही सर्दी खोकल ताप जाणवल्यास कोरोनाच्या तीन सुत्रांचे पालन करावे लागते. कोरोनात नियमांचे पालन न केल्याने सिंगापूरमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला २ आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Singaporean Crime News
Mumbai Crime News: वाघ कातडी आणि नखांची मुंबईत तस्करी; पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तमिलसेल्वम रामय्या (वय ६४) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साल २०२१ मध्ये या व्यक्तीने कोरोना झालेला असताना मुद्दाम सहकाऱ्यासमोर मास्क काढले आणि खोकला, असा आरोप करण्यात आला आहे. त्या प्रकरणी सोमवारी तमिलसेल्वम यांना शिक्षा सुनावण्यात आली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, साल २०२१ मध्ये तमिलसेल्वम लिओंग हुप सिंगापूरमध्ये क्लिनर म्हणून काम करत होता. १८ ऑक्टोबर रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे ऑफिसमध्ये त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तो पॉझीटीव्ह आला होता. आपण पॉझीटीव्ह आहोत हे समजल्यावर हा व्यक्ती लॉजिस्टिक ऑफिसमध्ये गेला होता.

ऑफिसमध्ये तमिलसेल्वम यांनी इतर सहकाऱ्यांसमोर मुद्दाम कोरोनाचे नियम मोडले. त्यांनी मास्क वापरले नाही. तसेच इतरांना लागण व्हावी यासाठी मुद्दाम त्यांच्यासमोर खोकले आणि शिंकले. ही घटना ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटी कॅमेऱ्यात कैद झाली होती.

कंपनीच्या असिस्टंट लॉजिस्टिक मॅनेजरने हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवला. तसेच या प्रकरणी तमिलसेल्वम यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Singaporean Crime News
Pune Crime: प्रियकरासाठी लाखोंचं कर्ज काढलं.. हप्ते भरण्यास नकार दिल्याने तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com