

इस्रायलवर दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. हमास आणि इस्राइल असं दोन्ही बाजून सुरु असलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने केलेल्या कारवाईचे गाझा पट्टीत परिणामही दिसून येत आहेत.
इस्राइल-हमास यांच्यातील संघर्षात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत 1600 हून अधिक मृत्यू झाले आहेत. इस्रायलमध्ये आतापर्यंत 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गाझा पट्टीमध्ये 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Latest News)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. हमासला कडक इशारा देत त्यांनी युद्ध इस्रायलने सुरू केले नाही मात्र ते आम्ही संपवू, असं म्हटलंय.
आम्हाला हे युद्ध नको होते. हे युद्ध अत्यंत क्रूर पद्धतीने सुरू करण्यात आले होते. हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसले तरी ते आम्ही संपवू. हमासला याची किंमत चुकवावी लागेल. आमच्यावर हल्ला करून त्यांनी मोठी चूक केली हे त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील.
आतंरराष्ट्रीय स्तरावर इस्राइलला मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल बेंजामिन नेतान्याहू यांनी सर्वांचे आभार मानले. इस्राइलमधून अपहरण केलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत. मात्र विजय आमचाच होईल. हमास ISIS चं दुसरं रुप आहे. हमासला देखील आम्ही संपवून टाकू, जसं ISISला संपवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.