Israel Hamas War : इस्त्राइलच्या हल्ल्यात गाझातील सर्वात मोठं हॉस्पिटल उद्ध्वस्त

Gaza News: चकमकीत अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्त्राइल सैन्य येथे तैनात आहे. त्यामुळे आता एकेकाळी सर्वात मोठं रुग्णालय म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण स्मशानभूमीप्रमाणे दिसत आहे.
Gaza
GazaSaam TV

Israel Hamas war:

इस्त्रायलकडून गाझावर झालेल्या हल्ल्यात शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाचे स्मशानभूमीत रुपांतर झाले आहे. येथे सर्वत्र मातीचा ढिगारा आणि मृतांचा खच पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नाहीये.

Gaza
Airstrikes In Gaza: इस्रायली सैन्याचा गाझामध्ये पुन्हा कहर; हवाई हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू

अल-शिफा असं या हॉस्पिटलचं नाव आहे. येथे पॅलेस्टिनी दहशतवादी काही दिवसांपासून रुग्णालयात लपून बसले होते. इस्त्रायल सैन्याला याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी रुग्णालयात घुसून हल्ला केला. या चकमकीत अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इस्त्राइल सैन्य येथे तैनात आहे. त्यामुळे आता एकेकाळी सर्वात मोठं रुग्णालय म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण स्मशानभूमीप्रमाणे दिसत आहे.

यूएन आरोग्य एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, अनेकवेळा प्रयत्न करून ते अयशस्वी झाल्यानंतर 25 मार्च रोजी गाझाची एक टीम रुग्णालयात पोहोचली. टेड्रोस अधानोम गेब्रेयस यांनी टिम रुग्णालयाजवळ पोहचल्यावर ट्वीट करत सांगितलं की, आमची टीम अल-शिफा गाझामधील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहचली आहे. आता त्याचे स्मशानभूमीत रूपांतर झाले आहे."

WHO ने दिलेल्या माहितीनुसार, गाझामधील ३६ मुख्य हॉस्पिटल पैकी आता फक्त १० हॉस्पिटल शिल्लक राहिले आहेत. गाझाच्या या युद्धाला आता पुढे काय दिशा मिळणार याबाबत कुणालाच काही माहिती नाही. युद्धामध्ये झालेल्या हल्ल्यात ११७० व्यक्तींनी आपला जीव गमवला आहे. मृत व्यक्तींमध्ये जास्तकरून सामान्य नागरिकांची संख्या जास्त आहे.

हल्ल्यावेळी हमासच्या काही आतंकवाद्यांनी जवळपास २५० व्यक्तींना कैद केले होते. त्यातील १३० व्यक्ती गाझामधील होत्या. या हल्ल्यात गाझा सैन्यातील ३० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झालाय.

Gaza
Crime News: मित्रावरच केला अनैसर्गिक अत्याचार, बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com