Israel Attack On Iran: २००० किमीचा प्रवास करत इस्रायलच्या १०० फायटर जेटचा इराणमध्ये धमाका, लष्करी तळं उद्धवस्त

Israel Attack On Iran: इस्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्या करण्यावरून अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवलाय.
Israel Attack On Iran: २००० किमीचा प्रवास करत इस्रायलच्या १०० फायटर जेटचा इराणमध्ये धमाका, लष्करी तळं उद्धवस्त
Israel Attack On Iran
Published On

इराणने केलेल्या केलेल्या हल्ल्यांचा बदला इस्रायलने इराणच्या लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ले करत घेतला. या हल्ल्यांसाठी १०० हून अधिक युद्धविमानांने (फायटर जेट) दज्वारे हल्ला करण्यात आला. यात अत्याधुनिक F-३५ चाही समावेश होता. इस्रायलच्या सैन्याने इराणचे अण्वस्त्र आणि तेलाचे खजिनांवर हल्ला करणं टाळलं. यामुळे इस्रायली सैन्याने एक प्रकारे स्वतःला आण्विक आणि तेलाच्या खजिन्यापासून दूर ठेवले आणि जगाला महायुद्धात ढकलण्यापासून रोखलं. पण या हल्ल्यांनंतर इराणमध्ये हाय अलर्ट करण्यात आलाय.

इराणही इस्रायलला प्रत्युत्तर देईल अशी शक्यता आहे. द जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, मोठ्या प्रमाणावर झालेल्या हल्ल्यात सुमारे २००० किलोमीटरचे अंतर पार करत इस्रायलच्या सैन्याने इराणमध्ये धमाका केला. हा हल्ला करण्यासाठी F-35 'आदीर' स्टेल्थ फायटरसह 100 हून अधिक विमानांचा समावेश होता. दरम्यान इलाम, खुजेस्तान आणि तेहरान प्रांतातील लष्करी लक्ष्यांना इस्रायली सैन्यांनी लक्ष्य केले, असे इराणने म्हटले आहे. या हल्ल्यांमुळे आपले कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचा दावा इराणकडून करण्यात आलाय.

इस्रायल ते इराणमधील अंतर साधरण २००० किमी आहे. इतक्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी विमानांमध्ये व्यापक इंधन भरण्याची क्षमता आवश्यक असते. ६६९ बचाव पथकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेत. IDF आता इराण, इराक, येमेन, सीरिया आणि लेबनॉन यांच्या संभाव्य प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून आहे. या देशांकडून बदला घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट आणि चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्झी हालेवी तेल अवीवमधील किरिया तळावर तैनात आहेत.

एका वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा मंत्रिमंडळाने काल रात्री फोन कॉन्फरन्स दरम्यान हल्ल्यासाठी परवानगी दिली. आयडीएफचे प्रवक्ते आर. ॲडम म्हणाले, "आयडीएफ आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही कारवायांसाठी पूर्णपणे सज्ज आहे. इराण आणि त्याच्या प्रॉक्सींवर बारकाईने नजर ठेवून आहे."इराणच्या लष्करी लक्ष्यांवर इस्रायलचे अचूक हल्ले हे स्वसंरक्षणाच्या अधिकाराशी सुसंगत आहते. व्हाईट हाऊसने इस्रायलच्या कृतींचे समर्थन केले आहे. 1 ऑक्टोबर रोजी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला हे प्रत्युत्तर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com