
हा धमाका आहे कतारची राजधानी दोहामधील.कारण युद्धखोर इस्त्राईलने गाझापट्टी, लेबनॉन, सीरीया, इराण, कुवैत, येमेन या देशानंतर आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवर थेट हल्ला केलाय.खरंतर इस्त्राईलने वेगवेगळ्या देशांविरोधात युद्धाची आघाडी उघडून मध्यपूर्व अशांत केलाय.त्यातच लहान मुलांसह हजारो नागरिकांचा जीव गेलाय.गाझा पट्टी बेचिराख झालीय.. त्यातच आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवर हल्ला करुन खळबळ उडवून दिलीय.यात हमासचे वरिष्ठ नेते गाझापट्टीतील युद्धविरामानंतर कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या चर्चेसाठी एकत्र आले होते.मात्र त्यांच्यावरच हल्ला करुन इस्त्राईलने आगीत तेल टाकलंय.तर आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कतारवर हल्ला झाल्याने कतारने तीव्र संताप व्यक्त केलाय.
दोह्यातील हल्ल्यावर कतारचा संताप
इस्त्राईलचा हल्ला म्हणजे स्टेट टेरिरिझम
इस्त्राईलकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन
या हल्ल्यासाठी बेन्यामिन नेत्यान्याहूंना जबाबदार धरण्याची मागणी
आता कतारवर हल्ला झाल्याने अमेरिकेनेही थेट इस्त्राईलला खडेबोल सुनावलेत..
इस्त्राईलच्या कुरापतींवर ट्रम्पचे खडेबोल
कतार आमचा महत्वाचा मित्रदेश
कतारचा हल्ला हा शांततेच्या प्रयत्नांना धक्का
मध्यपूर्वेतील देश आणि अमेरिकेनेच नाही तर भारतासह जगभरातील देशांनी कतारवरच्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय. खरंतर इस्त्राईलच्या हल्ल्यांमागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप होतो.आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवरच इस्त्राईलने हल्ला करुन थेट अमेरिकेलाच आव्हान दिलंय का? आणि इस्त्राईलने अमेरिकेला आव्हान दिल्याने अमेरिकेचं महासत्तापद संपुष्टात आलंय का? याचीच चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.