China New Virus : चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन व्हायरसवर सरकारची योजना तयार? भारतीयांना किती आहे धोका? आरोग्य मंत्रालयाने सांगितलं...

China Respiratory Illness: चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन व्हायरसवर सरकारची योजना तयार? भारतीयांना किती आहे धोका? आरोग्य मंत्रालयाने सांगितलं
China New Virus
China New VirusSaam Tv
Published On

China Respiratory Illness:

चीनमध्ये पुन्हा एका नवीन व्हायरसने शिरकाव केला आहे. यामुळे पुन्हा कोरोना व्हायरस सारखी परिस्थिती निर्माण होणार का? अशी चिंता जगभरातील देशांना पडली आहे. या व्हायरसचा परिणाम भारतातील नागरिकनांवरही होणार का, यासाठी सरकारने काय तयारी केली आहे? याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ते उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि H9N2 संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनमध्ये नोंदवलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा आणि श्वसनाच्या आजारांचा भारताला कमी धोका आहे.

China New Virus
Pune Covid Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळा, माजी आरोग्य प्रमुखांवर 90,00000 च्या घोटाळ्याचा आरोप

आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. काही माध्यमांनी उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आढळून आल्याचं वृत्त दिलं आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक निवेदन जारी केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्रालयाने सांगितले की, नुकतीच आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये H9N2 ची (एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरस) लागण झालेल्या एका व्यक्तीच्या प्रकरणाबाबत WHO ला दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर भारतातील एव्हीयन इन्फ्लूएंझावर चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली. (Latest Marathi News)

China New Virus
Mumbai Metro-12 : कल्याण-डोंबिवलीतून मुंबई, नवी मुंबई काही मिनिटांतच गाठता येणार! मेट्रो १२ ची निविदा येत्या २ दिवसांत

मंत्रालयाने पुढे सांगितलं की, " WHO ने या आजाराच्या जोखमीचे मूल्यमापन केले आहे, यानुसार या आजाराचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसार होण्याची शक्यता कमी दर्शवण्यात आली आहे. आतापर्यंत आढळलेल्या H9N2 प्रकरणांमध्ये मृत्युदरही कमी आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com