

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणने ‘प्लॅन बी’ तयार केला आहे.
खामेनेईंची चार टप्प्यांची खतरनाक रणनिती आखलीय.
अमेरिका समर्थक सुन्नी देश इराणच्या निशाण्यावर आहेत
अमेरिकेची विनाशकारी युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन इराणजवळ आली असतानाच इराणचं लष्करही सावध झालं आहे. इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी आणि त्यांच्या कमांडरनी चार टप्प्यांचा प्लॅन तयार केला आहे. हा प्लॅन जर यशस्वी झाला तर अमेरिका इराण युद्धातून माघार घेईल. याशिवाय शिया-सुन्नी राष्ट्रांमध्ये युद्ध होऊन त्याचे दोन भाग होतील, अशी रणनिती आहे. मध्य पूर्वेत अमेरीकेला पाठींबा देणारे सौदी अरब, जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमीरात म्हणजेच UAE, यमन, सीरिया, कुवैत हे सुन्नी पंथीय देश आहेत. तर इराण, इराक, अझरबैजान, बहरीन आणि लेबनॉन हे प्रमुख शिया बहुल देश आहेत.
इराणमध्ये काय शिजतंय ? पाहूया
प्लॅन ए मध्ये अमेरिकेची यूएसएस अब्राहम लिंकन युद्धनौका नष्ट करणे. प्लॅन बी मध्ये अमेरिका समर्थक देशांवर हल्ला करणे. प्लॅन सी मध्ये सुन्नी देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करणे आणि प्लॅन डी मध्ये जागतिक व्यापार मार्ग बंद करणे यांचा समावेश आहे. त्याशिवाय सुन्नी देशांमध्ये गृहयुद्ध छेडण्याचा आणि अमेरीकेला दिलेला पाठींबा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचीही इराणची रणनिती आहे. इराणने आपली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे जॉर्डन, युएई, सौदी अरेबिया, मिस्त्र या सुन्नी अरब देशांच्या दिशेने सज्ज ठेवलीत. इराकमधील संघटनांच्या मदतीने जॉर्डनमधील राजेशाही अस्थिर करून गृहयुद्ध सुरु करण्याचा प्लॅन आहे. शिया बहुल देश इराक, येमेन आणि लेबनॉनमधील आपल्या प्रॉक्सी संघटनांद्वारे इराण या देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करण्याची शक्यता आहे.
त्याशिवाय युरोपला अरब देशांशी जोडणारा लाल समुद्र हा महत्वाचा सागरी मार्ग रोखण्याचाही इराणचा प्रयत्न असणार आहे. इराणच्या संसदेने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या सामुद्रधुनीतून दररोज 20 दशलक्ष बॅरल तेलाची व्यापार केली जाते. जी जागतिक सागरी तेल व्यापाराच्या अंदाजे 25 ते 27% आहे. मार्ग बंद केल्याने तेलाच्या किमती वाढतील. ज्यामुळे युरोप ते आशियापर्यंतच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होईल. त्यामुळे अमेरीका-इराण युद्ध झाले तर त्याची झळ संपूर्ण जगाला बसणार हे निश्चित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.