IAS-IPS Wedding :आदर्शवत! ना बँडबाजा, ना वरात-घोडे...IAS-IPS जोडप्यानं अवघ्या २००० रुपयांत उरकलं लग्न

IAS-IPS Court Marriage : एका IPS आणि IAS अधिकारी असलेल्या जोडप्यानं फक्त २००० रुपयांत लग्न उरकून घेतलं.
IAS-IPS Wedding
IAS-IPS WeddingSaam Tv
Published On

IPS P Mounika And IAS Yuvraj Marmat Marriage : लग्न म्हटलं की धम्माल-मस्ती. संगीत सोहळा, मेहंदी सोहळा...हळद... नाचगाणं..वऱ्हाडी मंडळी आणि बरंच काही. सधन कुटुंब असेल तर, मग काय अमाप पैसाही खर्च करतात. सध्या तरी हाच ट्रेंड रुजलेला दिसतोय. अशा काळात एका IPS आणि IAS अधिकारी असलेल्या जोडप्यानं अगदी साधेपणानं लग्न उरकून घेतलं.

IAS अधिकारी युवराज मरमट आणि आयपीएस अधिकारी पी मोनिका यांनी कोर्टात लग्न केले आहे. अगदी साधेपणानं केलेलं हे लग्न सध्या चर्चेचा विषय झाला आहे. हल्लीचा ट्रेंड या लग्नानं मोडीत काढला आहे. अनेक जण लग्नसोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. पण छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी युवराज मरमट आणि आयपीएस पी मोनिका यांनी कोर्टात लग्न करून आदर्श निर्माण केला आहे.

IAS-IPS Wedding
PM Modi Greece Visit: ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुसराकारने केलं सन्मानित

त्यांच्या या साधेपणाचं सर्व क्षेत्रांतून कौतुक होत आहे. एकीकडे लोक लग्नावर लाखो रुपये खर्च करतात तर दुसरीकडे अगदी साध्या पद्धतीने लग्न केल्याने या जोडप्याचे कौतुक होत आहे. या दोघांनी लग्नात हार, मिठाई आणि कोर्ट फीसाठी फक्त २००० रुपये खर्च केले आहेत.

युवराज मरमट हे रायगड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तेलंगणा कॅडरच्या आयपीएस अधिकारी पी मोनिका यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. कोर्टरूममधील इतर सदस्यांना त्यांच्या साधेपणानं आश्चर्यचा धक्का बसला.

IAS-IPS Wedding
Kerala Accident: जीप उलटून २५ मीटर खोल दरीत कोसळली, दोन तुकडे झाले; भीषण अपघातात महिलांसह ९ जणांचा मृत्यू

२००० रुपयात लग्न

आयएएस अधिकारी युवराज मरमट आणि पी मोनिका यांनी लग्नावर एकूण २००० रुपये खर्च केले आहेत. लग्नात ना बँड बाजा ना वरात. अगदी साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या दोघांची ओळख प्रशिक्षणादरम्यान झाली होती.

दोघेही २०११ बॅचचे अधिकारी आहेत

IAS युवराज मरमट आणि IPS पी मोनिका हे २०११ बॅचचे अधिकारी आहेत. युवराज मरमट हे छत्तीसगड कॅडर तर, पी मोनिका तेलंगणा कॅडरमधील आहेत. UPSC मध्ये IAS युवराज मरमट यांना 458 आणि पी मोनिका यांना 637 रँक मिळाले आहे.

IAS-IPS Wedding
India Book Of Record 2023: तरुणाई 'योग्य वळणावर'; व्यसनमुक्तीसाठी झटणाऱ्या तरुणाचा गौरव, 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली दखल

प्रशिक्षणादरम्यान प्रेम जुळले

आयपीएस अधिकारी पी मोनिका यांची प्रशिक्षणादरम्यान आयएएस अधिकारी युवराज मरमट यांच्याशी ओळख झाली. दोघेही प्रेमात पडले. मरमट हे मूळचे राजस्थानमधील गंगानगर शहरातील आहेत. बीएचयूमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक शिक्षण घेतले आहे. आयएएस होण्यापूर्वी त्यांची भारतीय अभियांत्रिकी सेवेत निवड झाली होती.

पी मोनिका या फॅशन आयकॉन

आयपीएस अधिकारी पी मोनिका या 'फॅशन आयकॉन' आहेत. सोशल मीडियावर त्या सक्रिय असतात. आयपीएस पी मोनिका या पदवीधर आहेत. फिटनेसचीही त्या विशेष काळजी घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com