Climate change : २२० कोटी नागरिकांच्या जीवाला धोका, रिपोर्टनं जगाचं टेन्शन वाढवलं

North India, East Pakistan, East China And Sub-Sahara Africa: उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन उप -सहारा आफ्रिका देशांना सर्वाधिक धोका
Life Of 220 Crore People Risk
Life Of 220 Crore People RiskSaam Digital
Published On

Climate change Report :

जागतिक तापमान वाढीबाबत एका संशोधनात भीतीदायक माहिती समोर आली आहे. जर जागतिक तापमान २ डिग्री सेल्सिअसने वाढलं तर भारत, पाकिस्तानसह अनेक देशांमधील २२० कोटी नागरिकांना जीवघेण्या गर्मीचा सामना करावा लागणार आहे. तापमान वाढीनंतर हिटस्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कितीतरी पटीने वाढणार आहे. उत्तर भारत, पूर्व पाकिस्तान, पूर्व चीन उप -सहारा आफ्रिका देशांना सर्वाधिक आर्द्रतेच्या गर्मीचा सामना करावा लागू शकतो, असं या संशोधनात म्हटलं आहे.

३ डिग्री सेल्सियसने वाढू शकतं तापमान

हवामान बदलावर २०१५ मध्ये १९६ देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवणे, हा या करारामागचा उद्देश होता. मात्र, या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक तापमान वाढ ३ डिग्री सेल्सियसने वाढणार असल्याचा भीतीदायक अहवाल इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंज (आयपीसीसी ) या हवामान संशोधक संस्थेने सादर केला आहे.

Life Of 220 Crore People Risk
Shopian Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा गोळीबार, सुरक्षादलाच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

हवामान बदलाच्या विनाशकारी प्रयोगांना थांबवावं लागेल

हवामान बदलावर होणारा विनाशकारी परिणाम थांबविण्यासाठी जगाला २०१९ च्या तुलनेत २०३० पर्यंत उत्सर्जन निम्मे कमी करावे लागेल. तरच जागतिक सरासरी तापमानात झालेली वाढ १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखता येईल.दरम्यान जागतिक एजन्सींचा दावा आहे की, मागच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात सगळ्यात जास्त तापमान नोंदवले गेले आहे आणि चिंतेचा विषय म्हणजे २०२३ हे वर्ष सगळयात तप्त वर्ष म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे.

Life Of 220 Crore People Risk
IMD Rain Alert: पुढील ४८ तासांत 'या' राज्यांमध्ये कोसळणार परतीचा पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com