INS Arighat: भारतीय नौदलची बळ वाढलं; इंडियाची ताकद वाढताच पंगा घेण्याची भाषा करणाऱ्या शेजारच्या देशांनी बदलला रंग

China-Pakistan on INS Arighat: आयएनएस अरिघात भारतीय नौदलात सामील झाल्याने भारताची अणुशक्ती वाढलीय. यामुळे पाकिस्तानसह चीनच्या तज्ज्ञांनी भारताच्या सामर्थ्याची प्रशंसा केलीय.
INS Arighat: भारतीय नौदलची बळ वाढलं;  इंडियाची ताकद वाढताच पंगा घेण्याची भाषा करणाऱ्या शेजारच्या देशांनी बदलला रंग
China-Pakistan on INS Arighat
Published On

भारतीय नौदलाची ताकद वाढवलीय. काही दिवसापूर्वीच अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली INS अरिघात पाणबुडी नौदलात सामील झाली. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढल्याने नेहमी भारताशी पंगा घेणारे शेजारील दोन्ही देशांनी आपली भाषा बदलल्याचं दिसत. चीन आणि पाकिस्तानमधील संरक्षण तज्ज्ञांनी भारतीय संरक्षण मंत्र्यांचं कौतुक करत त्यांना 'पोलाद' असं म्हटलंय.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या आयएनएस अरिघात पाणबुडी नौदलात सामील झाल्याने देशाची आण्विक क्षमता आणखी मजबूत होणार आहे.आयएनएस अरिघातच्या समावेशाबाबत पाकिस्तानी आणि चिनी तज्ञांच्या प्रतिक्रिया दिलीय. दोन्ही देशांच्या संरक्षण तज्ज्ञांनी भारताची ताकद मान्य केली आहे. तसेच पाकिस्तानी तज्ञांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे कौतुक केलंय.

पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञ कमर चीमा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर आयएनएन अरिघातवर चर्चा केली. भारत आता जमीन, समुद्र आणि हवेतून अणू बॉम्बचा हल्ला करू शकतो, असे त्यांनी म्हटलंय. मात्र, ही ताकद यापूर्वीही भारताकडे होती. अरिघातच्या समावेश झाल्याने भारत नौदलात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट होतंय. कमर चीमा यांनी भारताच्या सामर्थ्याची कबुली देताना सांगितले की, संरक्षण मंत्री पाणबुडीच्या समावेशाच्या कार्यक्रमाला आले होते.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेतील नेव्हल सरफेस वॉर सेंटरला भेट दिली. दरम्यान पाणबुडीचा सैन्यात समावेश करण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी येऊ शकले असते. मात्र तिथे संरक्षण मंत्री त्या कार्यक्रमाला आले, हे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने त्याला पाहिले. यातून भारतीय संरक्षण मंत्री किती पॉवरफूल आहेत याचा संदेश सर्वत्र केला. तसेच पंतप्रधान फक्त एका आण्विक पाणबुडीसाठी येत नाहीत, हा संदेशदेखील अनेकांना गेल्याचं यातून दिसून आले.

मात्र, आयएनएस अरिघातच्या समावेशामुळे पाकिस्तानला कोणतीही अडचण येत नाही, असा दावाही पाकिस्तानी संरक्षण तज्ज्ञाने केलाय. ते म्हणाले की, भारत आधीच अणुशक्ती असणारा देश बनलाय, त्यामुळे आता पाकिस्तानला काळजी करण्यासारखे काही नाही. मात्र अण्वस्त्र पाणबुडी नवीन असल्याने पाकिस्तानसुद्धा आपल्या संरक्षणात नक्कीच वाढ करेल.

चीन सरकारचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्सवर एक लेख आयएनएस अरिघातबाबत लिहिला गेलाय. भारताने दुसऱ्या अणू क्षेपणास्त्र पाणबुडीचा वापर जबाबदारीने करावा, असा शीर्षक त्यांनी या लेखाला दिलाय. या लेखाच्या मथळ्यावरून हे स्पष्ट होते की, या हल्ल्यामुळे चीनही किती चिंतेत आहे. ग्लोबल टाइम्सचे संरक्षण पत्रकार लिऊ झुआनजुन म्हणतात की,बीजिंगस्थित लष्करी तज्ञाने नाव न सांगण्याच्या अटीवर ग्लोबल टाईम्सला सांगितले की अधिक आण्विक-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांमुळे भारताची आण्विक प्रतिकारशक्ती वाढलीय, परंतु त्याचा वापर करण्याची जबाबदारी देखील घेतली पाहिजे.

INS Arighat: भारतीय नौदलची बळ वाढलं;  इंडियाची ताकद वाढताच पंगा घेण्याची भाषा करणाऱ्या शेजारच्या देशांनी बदलला रंग
Jammu Kashmir Encounter: जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com